AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu & Kashmir Raids: NIA चे काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे, जमात-ए-इस्लामी विरोधात कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांसह बुधवारी काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे टाकले. प्रतिबंधित संघटनेच्या जमात-ए-इस्लामी (JeI) विरोधात ही कारवाई करण्यात आली.

Jammu & Kashmir Raids: NIA चे काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे, जमात-ए-इस्लामी विरोधात कारवाई
Jammu Kashmir Police (Image for representation only)
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 4:45 PM
Share

श्रीनगरः राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांसह बुधवारी काश्मीरमध्ये 11 ठिकाणी छापे टाकले. आजच्या कारवाईत श्रीनगर, बारामूला, पुलवामा, अवंतीपोरा, सोपोर, गंदरबल, बडगाम, बांदीपोरा, पुलगाम आणि शोपियामध्ये छापे टाकण्यात आल्या. जम्मू-काश्मीरमध्ये मध्यंतरी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधित संघटनेच्या जमात-ए-इस्लामी (JeI) विरोधात ही कारवाई करण्यात आली. या दहशतवादी संघटने दहशतवादी कृत्त्यांसाठी पैसे पुरवणेयाचा आरोप आहे. 10 ऑक्टोबरला पण एनआईए ने 16 ठिकाणी छापेमारी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुलगाम, बारामुला, श्रीनगर यी ठिकाणी दहशतवाद विरोधात कारवाई केली होती.  (NIA Jammu & Kashmir Raids against Jamait e islam terror attacks)

‘व्हॉईस ऑफ हिंद’

देवसर येथील मोहम्मद अखराम बाबाचे घर आणि बाबापोरा येथील शबाना शाह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. मोहम्मद अखराम (६९) हा देवसर येथील रहिवासी आसून निवृत्त सरकारी कर्मचारी आहे. त्या जमात-ए-इस्लामी संबंधित असल्याचा म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकाच्या प्रकाशना संबंधीत (ज्याचा उद्देश तरुणांना भडकावणे आणि कट्टरपंथी बनवणे आहे) ही कारवाई करण्यात आली. टीआरएफ (द रेझिस्टन्स) कमांडर सज्जाद गुल यांच्या घरावरही छापा टाकण्येत आला.

दोन महिन्यांपासून दहशतवादी

पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी दबा धरुन बसल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे विविध गट जंगलात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुंछ राजौरी भागात ऑगस्ट महिन्यापासून एन्काऊंटर्स सुरु आहेत. 6 ऑगस्टला दोन दहशतवाद्यांचा, तर, 13 सप्टेंबरला एका दहशतवाद्याचा खात्मा कण्यात आला होता.

दहशतवाद्यांनी 11 ऑक्टोबरच्या रात्री हल्ला केला तेव्हा भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता. तर, 14 ऑक्टोबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणखी चार जवानांना वीरमरण आलं होतं त्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश होता.

इतर बातम्या 

अँकरशी भांडण, शोएब अख्तरचं तांडव, लाईव्ह शो मध्ये तडकाफडकी राजीनामा, Video पाहाच!

एनीसीबीचं दिल्लीतून आलेलं पथक कामाला लागलं, समीर वानखेडेंचा जबाब नोंदवण्यास सुरुवात, कथित 25 कोटी डीलचं खरं-खोटं बाहेर पडणार

NIA Jammu & Kashmir Raids against Jamait e Islam terror attacks

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.