अँकरशी भांडण, शोएब अख्तरचं तांडव, लाईव्ह शो मध्ये तडकाफडकी राजीनामा, Video पाहाच!

पाकिस्तानने जसाही टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताचा पराभव केलाय, तेव्हापासून पाकिस्तानचे खेळाडू, फॅन्स, माजी क्रिकेटपटूंनी आभाळाला लाथा मारणं सुरु केलंय. भारताविरोधात विजय मिळवून 3 दिवस उलटून गेलेत पण विजयाची चर्चा आणखी काही थांबली नाही, एवढ्यात थांबणारही नाही म्हणा, कारण या विजयासाठी पाकिस्तानमधल्या कित्येक पिढ्यांनी वाट पाहिलीय.

अँकरशी भांडण, शोएब अख्तरचं तांडव, लाईव्ह शो मध्ये तडकाफडकी राजीनामा, Video पाहाच!
शोएब अख्तर


मुंबई : पाकिस्तानने जसाही टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताचा पराभव केलाय, तेव्हापासून पाकिस्तानचे खेळाडू, फॅन्स, माजी क्रिकेटपटूंनी आभाळाला लाथा मारणं सुरु केलंय. भारताविरोधात विजय मिळवून 3 दिवस उलटून गेलेत पण विजयाची चर्चा आणखी काही थांबली नाही, एवढ्यात थांबणारही नाही म्हणा, कारण या विजयासाठी पाकिस्तानमधल्या कित्येक पिढ्यांनी वाट पाहिलीय. मुद्दा असा की पाकिस्तानच्या खेळाविषयी चर्चा करण्यासाठी आजी माजी खेळाडू, दिग्गज एक्सपर्ट्स इंटरनॅशनल टीव्हीवर लाईव्ह होते. यावेळी अँकरसोबत लागलेल्या भांडणातून रावळपिंडी एक्सप्रेसने थेट तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

टी-20 विश्वचषक सुरू झाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट संघ चर्चेत आहे. पाकिस्तानने भारताला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर सतत टीव्हीवर विश्लेषण करतो आहे. लाईव्ह शो दरम्यान शोएब आणि पाकिस्तानी टीव्ही अँकर यांच्यात तू तू मैं मैं पाहायला मिळाली. यानंतर शोएबने थेट राजीनामा सादर केला. ठमला जी जी वागणूक दिली जात आहे ती सहन करण्यायोग्य नाहीठ, असं म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला.

शोएब अख्तर पाकिस्तानच्या पीटीव्हीवर इतर अनेक माजी क्रिकेटपटूंसोबत चर्चेत भाग घेतला होता. या वादात शोएब अख्तर, विवियन रिचर्ड्स, सना मीरसह अनेक माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर डॉ.नौमन यांनी केले. यादरम्यान डॉ. नौमान असे काही बोलले, ज्याचं शोएब अख्तरला प्रचंड वाईट वाटले आणि नंतर त्याने पीटीव्हीमधून राजीनामा देण्याची घोषणा केली.

टीव्ही शोमध्ये काय घडले?

या वादात शोएब अख्तर हा पाकिस्तानचा बोलर शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांच्याबाबत काही मुद्दे मांडत होता. यादरम्यान डॉ.नौमानने शोएब अख्तरला सांगितले की, ठतू उद्धटपणे बोलत आहेस, तू ओव्हर स्मार्ट होत आहेस, त्यामुळे तू जाऊ शकतोस… यानंतर शोएब अख्तर संतापला… मी इथेच थांबतोय, मी तुमच्याविरुद्ध काहीही बोलत नव्हतो, मी मुद्द्यावर बोलत होतोठ, असं शोएब म्हणाला. मात्र यानंतर तो थांबला नाही आणि त्याने थेट टीव्हीवरच राजीनाम्याची घोषणा केली. शोएब अख्तर म्हणाला की, ठमी पीटीव्हीमधून रिजाईन करत आहे, नॅशनल टीव्हीवर मला ज्या प्रकारे वागणूक दिली गेली, त्यानंतर मला वाटत नाही की मी इथे राहावंठ. यानंतर शोएब अख्तरने लाईव्ह टीव्हीवरील शो सोडला.

शोएब अख्तर नंतर काय म्हणाला?

या संपूर्ण प्रकरणानंतर शोएब अख्तर म्हणाला की, मी डॉ. नौमानला माफी मागायला सांगितली होती, पण त्यांनी तसे केले नाही. परदेशी खेळाडूंसमोर माझ्याशी अशी वागणूक झाली, जे माझ्यासाठी खूप वाईट होते. मी नॅशनल स्टार आहे, पण ज्या पद्धतीने ते बोलले ते पूर्णपणे चुकीचे होते. शोएब अख्तर म्हणाला की, विवियन रिचर्ड्स आणि डेव्हिड गोवर यांच्यासमोर माझ्याशी अशी वागणूक झाली, हे अजिबात योग्य नाही.

(Pakistan Shoaib Akhtar live TV resignation t20 World Cup)

हे ही वाचा :

पहिल्यांदा म्हणाला, ‘रिजवानकडून हिंदूंमध्ये उभं राहून नमाज अदा, गर्व वाटतो’, टीकेची झोड उठल्यानंतर वकार म्हणतो, ‘मला माफ करा’

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित

PAK vs NZ: न्यूझीलंडच्या कॉन्वेने टिपलेला झेल पाहून सर्वच चकीत, ‘क्रिकेटर कि सुपरमॅन?’, पाहा VIDEO

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI