Jammu Kashmir : मोठी खळबळ! जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोसळणार? 25 आमदार…भाजपाच्या गोटात घडामोडी वाढल्या

देशाच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येथे सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या आमदारांचा एक गट नाराज आहे. आमदारांच्या नाराजीनंतर आता या पार्टीतील अंतर्गत असंतोष समोर आल्याचं बोललं जातंय. सूत्रंच्या माहितीनुसार साधारण 18 ते 25 आमदार नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

Jammu Kashmir : मोठी खळबळ! जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोसळणार? 25 आमदार...भाजपाच्या गोटात घडामोडी वाढल्या
national conference and omar abdullah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 5:20 PM

National Conference 20 MLA Revolt : देशाच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येथे सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या आमदारांचा एक गट नाराज आहे. आमदारांच्या नाराजीनंतर आता या पार्टीतील अंतर्गत असंतोष समोर आल्याचं बोललं जातंय. सूत्रंच्या माहितीनुसार साधारण 18 ते 25 आमदार नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

आमदारांमध्ये नाराजी कशामुळे?

जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. येथे आमदार नाराज नाराज असल्याचे बोलले जातेय. सत्ताधारी पक्षाने नुकतेच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारावर काही आमदार नाराज आहेत. ही नाराजी वरिष्ठांना कळवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आमच्या नाराजीची दखल न घेतल्यास सरकार उलथवून लावू, असा इशाराही आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्स तसेच या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांना दिला आहे.

Loading...

भाजपाचे घडामोडींकडे लक्ष

नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील नाराज आमदारांची संख्या अगोदर 18 असल्याचे बोलले जात होते. परंतु आता नाराज आमदारांची संख्या ही 25 असल्याचा दावा केला जातोय. सध्या सत्ताधारी पक्षात घडत असलेल्या या गडामोडींकडे विरोधी बाकावर असलेल्या भाजपाचे संपूर्ण लक्ष आहे. नाराज आमदारांच्या पुढच्या भूमिकेनुसार भाजपा आपले राजकीय डावपेच आखण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेचे गणित काय?

जम्मू काश्मीरमध्ये एकूण 90 आमदारांची विधानसभा आहे. सत्ता हवी असेल 46 हा जादुई आकडा गाठणे गरजेचे आहे. 2024 साली झालेल्या विधानसा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या. भाजपाला 29 तर काँग्रेसला 6 आणि पीडीपीला 3 जागा मिळाल्या होत्या.

आमदार स्थापन करू शकतात वेगळा गट

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील ही नाराजी वाढत गेल्यास नाराज आमदार आपला वेगळा गट स्थापन करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर आमदार वेगळा गट स्थापन करून भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. असे झाल्यास नॅशनल कॉन्फरन्सचे तेथील सरकार कोसळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us