
जम्मू-काश्मीरमधूील नौगाम पोलिस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा स्फोट झाला. फरीदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने घेत असताना झालेल्या अपघाती स्फोटात 9 सात जण ठार तर पोलिस ठार आणि 30 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस स्टेशनमधील स्फोटानंतर तलावातील धुराचे लोट आणि ज्वाळा हवेत उडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. स्फोटात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Delhi Blast) झालेल्या कारस्फोटाच्या काही दिवसांनंच्या आतच हा स्फोट झाला. त्या आत्मघातकी हल्ल्यात 12 जणांनी जीव गमावला तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते.
नौगाम पोलिस स्टेशन परिसरात स्फोट
श्रीनगरच्या बाहेरील नौगाम पोलिस ठाण्यात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून अधिकारी नमुने काढत असताना हा स्फोट झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात 9 जण मृत्यूमुखी पडले तर 30 जण जखमी झाले, ज्यात बहुतेक पोलिस आणि फॉरेन्सिक अधिकारी होते असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
#WATCH | A blast occurred near the premises of Nowgam police station in Jammu and Kashmir. More details awaited. Security personnel present at the spot. pic.twitter.com/nu64W07Mjz
— ANI (@ANI) November 14, 2025
अटक करण्यात आलेला डॉक्टर मुझम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या 360 किलो स्फोटकांचा भाग असलेल्या या साहित्याचे नमुने तपासादरम्यान घेतले जात होते, तेव्हाच हा भीषण स्फोट झाला. घटनास्थलावरून आत्तापर्यंत 6 जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, मात्र मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षात नेण्यात आले आहेत.
श्रीनगर डेप्युटी कमिश्नरनी केली जखमींची विचारपूस
नौगाम पोलिस स्टेशन परिसराजवळ झालेल्या या स्फोटानंतर चौकशी व तपास करण्यासाठी सुरक्षा दलांसह स्निफर डॉग्स पोहोचले आहेत. श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलिस स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात जखमी झालेल्यांची रुग्णालयात भेट घेतली.
#WATCH | Srinagar, J&K | Security forces, along with sniffer dogs, arrive to carry out the investigation where the blast occurred near the premises of Nowgam police station in Jammu and Kashmir. More details awaited. Security personnel present at the spot. pic.twitter.com/I0ENN1PLH3
— ANI (@ANI) November 14, 2025
24 पोलिस व अनेक नागरिक जखमी
अधिकाऱ्यांच्यां सांगण्यानुसार, शहरातील विविध रुग्णालयात किमान 24 पोलिस आणि तीन नागरिकांना दाखल करण्यात आले आहे. या प्रचंड स्फोटामुळे पोलिस ठाण्याच्या इमारतीचेही बरेच नुकसान झाले. जखमी पोलिसांना शहरातील विविध रुग्णालयात नेण्यात आले. सतत होणाऱ्या लहान स्फोटांमुळे बॉम्बशोधक पथकाला तातडीने बचाव कार्य करणे कठीण झाले.