24 तासांत 6 अतिरेक्यांना कंठस्नान! 1 जवान शहीद, मोदींच्या जम्मू काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

| Updated on: Apr 22, 2022 | 12:56 PM

Jammu Kashmir Terrorist: बारामुल्लामध्ये लष्कर कमांडरचा खात्मा करण्यात आला. गोळीबारात चार जवान जखमी झाले आहेत.

24 तासांत 6 अतिरेक्यांना कंठस्नान! 1 जवान शहीद, मोदींच्या जम्मू काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
जम्मू काश्मिरात मोठी कारवाई
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पुन्हा एकदा शांतात भंग करण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून (Terrorist Activities in Jammu Kashmir) गेला जातो आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत सहा अतिरेक्यांचा खात्मा  (6 Terrorist killed) करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत अतिरेकी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये चकमकी झाल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बलाच्या जवानांकडून करण्यात आलेली कारवाई मोठी आणि तितकीच महत्त्वाची मानली जाते आहे. 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू काश्मीर दौरा असणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या सांबा इथल्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी ज्या भागात चकमक झाली, तो भाग सांबापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या वाढलेल्या जम्मू काश्मीरमधील कारवायांना रोखण्याचं तगडं आव्हानं सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांसोबत तिथल्या प्रशासकीय यंत्रणेसमोरही उभं ठाकलंय.

गुरुवारी चौघांना कंठस्नान!

गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाई एकूण चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यातील मालवाह परिसरात चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. यात मोस्ट वॉन्टेड अतिरेकी युसूफ कांटरुचाही समावेश आहे. युसूफ कांटरु हा लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटेशी संलग्न होता. दहा मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची यादी सुरक्षाबलाकडून जारी करण्यात आली आहे. सुरक्षा बलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या शोध मोहिमेनंतरत ही कारवाई करण्यात आली.

एका घरात अतिरेकी लपून बसेल असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसर शोधमोहिम राबवण्यात आली. मालवाहच्या परिसरात करण्यात आलेल्या शोध मोहिमेत घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला जवानांनीही तोडीसतोड प्रत्युत्तर दिलंय.

लष्कर-ए-तौयबाच्या कमांडरचा खात्मा

दरम्यान, बारामुल्लामध्ये लष्कर कमांडरचा खात्मा करण्यात आला. गोळीबारात चार जवान जखमी झाले आहेत. या गोळीबारात अतिरेकी युसुफ कांटरुचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. 2005 मध्ये युसुफला अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर 2008 मध्ये तो सुटला होता. त्यानंतर 2017 साली अतिरेकी संघटनेत सामील झाला. अतिरेकी युसूफनं त्यानंतर हत्या केल्या. हिजबुल सोडून नंतर युसूफ लष्कर ए तोयबामध्ये सामील झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

एक जवान शहीद

दरम्यान, शुक्रवारी अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. सीयआईएसएफ च्या एका बसवर निशाणा लावत अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात एका जवानाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत 9 जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. मोदींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरात बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.