AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jee advanced 2021: जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

Jee advanced 2021: जेईई ॲडव्हान्सड  परीक्षेची तारीख जाहीर, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 10:05 PM
Share

Jee Advanced 2021नवी दिल्ली : आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सर्व कोविड प्रोटोकॉलचं पालन करुन ही परीक्षा घेण्यात येईल,असंही ते म्हणाले. जेईई-मेन्सची चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

जॉइंट एक्झाव्हाएंट्रन्स ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला जाणार होता.

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

जेईई मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्येवाढ

जेईई-मेन्सच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी 20 जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) च्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर यांनी परीक्षा केंद्रांची सख्या वाढवल्याच सांगितले होते. कोविड 19 साथीच्या रोगामुळे या वेळी परीक्षा 232 ऐवजी 334 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक शिफ्टमधील परीक्षा केंद्रांची संख्याही 660 वरन 828 करण्यात आली आहे.

आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करणार

JEEAdvanced2021परीक्षेचे आयोजन आयआयटी खरगपूर करणार आहे. जॉईंट एक्झामिनेशन बोर्डाच्या सहकार्यानं आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करेल. आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं.

75 टक्केंची अट रद्द

JEE Advanced परीक्षेला बसणायासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बारावीला 75 टक्के गुण मिळवणं आवश्यक होते. मात्र, यावर्षी 75 टक्के गुणांची अट रद्द करण्यात आली आहे.

जेईईमेन परीक्षा 4 सत्रांमध्ये

रमेश पोखरियाल निशंक यांनी यापूर्वी जेईई मेन 2021 परीक्षा चार सत्रात होणार असल्याचं जाहीर केलं होते. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

15 टक्के शुल्क कपात, शालेय फी वाढीसंदर्भात राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, अध्यादेश आणण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

NEP: नव्या शैक्षणिक धोरणाची वर्षपूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यक्रमाला संबोधित करणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.