मोठी बातमी : JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

| Updated on: Jan 19, 2021 | 3:19 PM

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी : JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
दहावीची परीक्षा रद्द
Follow us on

नवी दिल्ली : JEE मेन्स परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. JEE मेन्स परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांना NIT, IIT, SPA आणि CFIT सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.(No requirement of 75% marks in 12th exam for JEE Mains exam this year)

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील महिन्यात याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता JEE मेन्स परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. 12वी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

JEE परीक्षा वर्षातून 4 वेळा

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मागील महिन्यात केलेल्या घोषणेनुसार 2021 पासून JEE मेन्स परीक्षा वर्षातून 4 वेळा घेतली जाणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात आयोजित केली जाणार आहे. JEE मेन्स परीक्षेच पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या दरम्यान होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षी IIT सह टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12 वी परीक्षेत 75 टक्के गुण घेण्याची अट यंदा रद्द करण्यात आली आहे.

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच

10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल 22 डिसेंबर रोजी केली होती. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं हा विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे आणणार ठरेल. नोकरी आणि प्रवेश मिळवताना पुढील काळात अडचणी निर्माण होऊ शकताता. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

No requirement of 75% marks in 12th exam for JEE Mains exam this year