रात्री शिवानीच नवऱ्यासोबत भांडण झालं, सकाळी बिछान्यामध्ये..रुमचा दरवाजा उघडल्यावर सगळेच हडबडले, सोशल मीडियावरची Love स्टोरी
सोशल मीडियावरुन दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत पुढे मैत्रीचं प्रेमात झालं. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न झालं. पण वेळे जशी पुढे जाऊ लागली, तशा गोष्टी बदलू लागल्या.

सोशल मीडियावरुन दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत पुढे मैत्रीचं प्रेमात झालं. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न झालं. पण वेळे जशी पुढे जाऊ लागली, तशी दोघांमध्ये भांडणं, वाद वाढू लागले. छोट्या-छोट्या गोष्टीवरुन वाद होऊ लागला. रात्री सुद्धा दोघांमध्ये भांडणं झालं. वाद शांत झाल्यानंतर काही वेळाने पतीने बॅग मागितली. खोलीला बाहेरुन कडी लावली व तिथून निघून गेला. सकाळी दरवाजा उघडला, त्यावेळी बिछान्यावर पत्नीचा मृतदेह पडलेला. झाशीच्या सिपरी बाजार क्षेत्रात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. सुधा उर्फ शिवानी वंशकार असं मृत महिलेचं नाव आहे. ती 27 वर्षांची होती. शिवानीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने पती यश ठाकूरवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर यश फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अजूनही हत्येची पुष्टि केलेली नाही. महिलेच्या गळ्यावर दुखापतीचे निशाण आहे. पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. मृत्यूचं नेमक कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानतंरच समजेल.
शिवानी आणि यशची लव्ह स्टोरी दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाली. यश कपड्याच्या दुकानात नोकरीला होता. दोघांनी लग्नाची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मान्यता दिली. लग्नानंतर शिवानी पतीसोबत ग्वालियरमध्ये रहायची. त्यावेळी सोशल मीडियावरुन सुरु झालेलं हे प्रेम रहस्यमयी मृत्यूमध्ये बदलेलं असा कोणी विचार केला नसेल. लग्नानंतर काही काळाने दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडणं वाढली. यश अनेकदा माझ्या बहिणीला मारहाण करायचा असा आरोप शिवानीची बहिण मुस्कानने केला. भांडण वाढल्यानंतर शिवानी ग्वालियर सोडून आवास विकास भागात फौजी तिराहाजवळ भाड्याच्या खोलीत रहायची. बहिण मुस्कान आणि भाऊ अनिकेतही सोबत रहायचे. शिवानीचा यश सोबत संपर्क पूर्णपणे तुटला नव्हता. तो झाशीला येऊन-जाऊन असायचा.
आतलं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला
रक्षाबंधनाच्या एकदिवस आधी शिवानी छोटा भाऊ कपिलला घेऊन ग्वालियरला गेलेली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, ती तिथे दोन दिवस थांबल्यानंतर पती यशसोबत परत झाशीला आली. कपिल नंतर गावी निघून गेला. रविवारी रात्री दोघांमध्ये 10 ते 10.30 दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतोष मामाने मध्यस्थी करुन भांडणं सोडवलं. मुस्कान आपल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेली. शिवानी आणि यश दोघे दुसऱ्याखोलीत गेले. रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान यशने आपली बॅग आणि सामान मागितलं.
तोंडातून रक्त येत होतं
मुस्कानने त्याला बॅग दिली. सामान बॅगेत भरल्यानंतर यशने रुमला बाहेरुन कडी लावली व तिथून निघून गेला. यश निघून गेल्यानंतर दरवाजा बाहेरुन बंद होता. सकाळी मुस्कान आणि अनिकेतने दरवाजा उघडला. त्यावेळी आतलं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. शिवानीचे हात आकडलेले. तोंडातून रक्त येत होतं. शिवानीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शिवानीच्या मृत्यूसाठी कुटुंबिय यशला जबाबदार धरतायत. त्याच्यावर आरोप करतायत. पण पोलिसांना पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.