JNU मध्ये विसर्जन मिरवणुकीवर हल्ला, ABVP चा आरोप, डाव्यांचाही पलटवार

JNU मध्ये ABVP आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. ABVP ने विसर्जन मिरवणुकीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे, तर डाव्यांनी ABVP वर धर्माचा राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे.

JNU मध्ये विसर्जन मिरवणुकीवर हल्ला, ABVP चा आरोप, डाव्यांचाही पलटवार
| Edited By: | Updated on: Oct 03, 2025 | 5:02 PM

JNU मध्ये पुन्हा वातावरण तापलं आहे. JNU मध्ये ABVP आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. याबाबतची अधिकची माहिती अशी आहे की, ABVP ने विसर्जन मिरवणुकीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर याला उत्तर देताना डाव्यांनी ABVP वर धर्माचा राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, नेमकं काय घडलं, याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर डाव्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे, तर डाव्या संघटनांनी ABVP वर राजकीय प्रचारासाठी रावणदहन कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचा वापर केल्याचा आरोप केला आहे. या विषयावर JNU प्रशासनाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

ABVP ने एका निवेदनात म्हटले आहे की, IS, SFI आणि DSF सह डाव्या गटांनी संध्याकाळी सातच्या सुमारास साबरमती टी पॉईंटजवळ विसर्जन मिरवणुकीवर हल्ला केला. दगडफेक आणि गैरवर्तनात अनेक मुले-मुली जखमी झाल्याचा दावा ABVP ने केला आहे.

‘विद्यार्थ्यांच्या श्रद्धेवर थेट हल्ला’

ABVP JNU चे अध्यक्ष मयंक पांचाळ म्हणाले की, हा केवळ धार्मिक कार्यक्रमावरील हल्ला नाही तर विद्यापीठाच्या उत्सवी परंपरेवर आणि विद्यार्थ्यांच्या श्रद्धेवर थेट हल्ला आहे. ABVP कोणत्याही किमतीत अशी आक्रमकता सहन करणार नाही. ABVP चे JNU मंत्री प्रवीण पियुष यांनी आरोप केला आहे की, दुर्गा विसर्जनासारख्या पवित्र विधींदरम्यान दगडफेक करणे आणि मुलींना मारहाण करणे निंदनीय आणि लज्जास्पद आहे. प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. मात्र, डाव्या संघटनांशी संलग्न ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (IS) हे आरोप फेटाळून लावले असून ABVP वर राजकीय प्रचारासाठी धर्माचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

उमर खालिद आणि शरजील इमामचा फोटो

AISA ने एका निवेदनात म्हटले आहे की, ABVP रावण दहनाचे आयोजन करत आहे, ज्यामध्ये JNU चे माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम रावणाच्या रूपात दर्शविले गेले होते. या दोघांवर CAA विरोधी निदर्शने आणि दिल्ली दंगली घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी खटला सुरू आहे.

“हे इस्लामोफोबियाचे क्रूर प्रदर्शन आहे ज्यामध्ये राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा वापर केला जात आहे. 2020 च्या दिल्ली दंगलीत प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप असलेल्या नथुराम गोडसे, गुरमीत राम रहीम किंवा नेत्यांची निवड का केली नाही, असा सवाल IS ने ABVP ला विचारला आहे.