JNU मध्ये पुन्हा राडा, दोन गटात जोरदार हाणामारी, कॅम्पसमध्ये पोलिसच पोलीस…

| Updated on: Nov 10, 2022 | 9:36 PM

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याने लाठ्याकाठ्याने मारहाण झाल्याने विद्यापीठ परिसराला आता पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

JNU मध्ये पुन्हा राडा, दोन गटात जोरदार हाणामारी, कॅम्पसमध्ये पोलिसच पोलीस...
Follow us on

नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. जेएनयू मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही मुलांच्या हातात लाठ्या असून लाठ्याकाठ्या असणाऱ्यांनी चेहरेही आपले झाकले आहेत. व्हायरल झालेला व्हिडीओ आज संध्याकाळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी दोन विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता.

 

त्यानंतर काही मुले त्या ठिकाणी काठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात फिरताना दिसून आली. विद्यापीठ परिसरात झालेल्या या हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

याप्रकरणाची पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये असं सांगण्यात आले आहे की, सायंकाळी दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती.

त्यानंतर मात्र सर्व वातावरण शांत झाले होते. त्या हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाल्याने हा वाद पुन्हा चिघळला होता. मात्र तरीही दोन्ही गटांनी परस्पर वाद मिठवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर मात्र दोन्ही गट आमनेसामने आले आणि लाठ्या काठ्याने एकमेकांना मारल्याचे सांगितेल. या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

हा वाद दोन विद्यार्थ्यांमध्ये झाला असून यामध्ये कोणत्याही राजकीय गटाचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा वाद दोघामधील वैयक्तिक कारणामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर या वादावर विद्यापीठ प्रशासनाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

दिल्ली पोलिसांनीही याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वैयक्तिक कारणामुळे हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.