
तुम्ही देखील डासांपासून त्रस्त आहात? तर मग आज आपण अशा काही उपायांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला डासांच्या त्रासापासून कायमची सुटका मिळू शकते. डास हे खूपच उपद्रवी असतात, ज्या घरात डास मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे अनेक समस्या निर्माण होतात. जसं की रात्रभर डास चावल्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही, अन् मग सकाळी तुमची चिडचिड होते. एवढंच नाही तर डासांमुळे अनेक प्रकारच्या खतरनाक आजारांचा प्रसार होण्याचा देखील धोका असतो, ज्यामध्ये डोंग्यू, मलेरिया, यासारख्या आजारांचा समावेश आहे. त्यामुळे डासांना आपल्या घरात येण्यासाठी प्रतिबंध करणं आवश्यक असतं, त्यासाठी अनेक उपाय आहेत. जसं की घरांच्या खिडक्यांना जाळ्या बसवणे, साचलेल्या पाण्यात डास होऊ नयेत, यासाठी गप्पी मासे पाळणे, पाणी जास्त काळ साठवून न ठेवणे, परंतु आम्ही तुम्हाला आज अशा तीन झाडांची माहिती सांगणार आहोत, ती जर तुम्ही तुमच्या घरात लावली तर डास तुमच्या घराकडे फिरकणार देखील नाहीत.
काही विशिष्ट झाडं अशी असतात ज्या झाडांचा वास हा डासांना आवडत नाही, किंवा ते तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे अशी काही झाडं तुम्ही तुमच्या घरात लावली तर तुम्ही डासांना निश्चितच तुमच्या घरापासून दूर ठेवू शकता. यामुळे अनेक आजारांमधून तुमची सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात ही तीन झाडं नेमकी कोणती आहेत, त्याबद्दल माहिती.
मोगरा – मोगरा हे भारतातील सर्वात लोकप्रिय फुलांच्या झाडापैकी एक झाड आहे, मोगऱ्याला बाजारात वर्षभर मोठी मागणी असते, देवपूजा तसेच गजऱ्यासाठी मोगऱ्यांच्या फुलांचा वापर होतो. मोगरा या झाडाला छान सुवासिक पांढऱ्या रंगाचे फुलं येतात. या फुलांच्या वासामुळे डासांना त्रास होतो, आणि ते ज्या घरात मोगरा आहे, त्या घरापासून दूर राहतात.
तुळस – तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळशीचे जसे धार्मिक उपयोग आहेत, तसेच तिचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहे. तुळस डासांना घरापासून दूर ठेवण्याचं काम करते.
पेपर मिंट – पेपर मिंटला असलेला विशिष्ट प्रकारचा वास हा डासांना आवडत नाही, त्यामुळे ज्या घरात हे झाड आहे, त्या घरापासून डास दूर राहतात.