हनी ट्रॅप की पैशांचा लोभ? ज्योती मल्होत्रा कशी फसली? Honey Trap चं जाळं कसं असतं?

ज्योती मल्होत्रा या यूट्यूबरला हेरगिरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता हनी ट्रॅप म्हणजे काय असे विचारले जात आहे.

हनी ट्रॅप की पैशांचा लोभ? ज्योती मल्होत्रा कशी फसली? Honey Trap चं जाळं कसं असतं?
JYOTI MALHOTRA
| Updated on: May 20, 2025 | 6:18 PM

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. सध्या तिची कसून चौकशी केली जात आहे. तिच्या अटकनेनंतर आता पाकिस्तानच्या आयएसआय या एजन्सीने हनी ट्रॅपची पद्धत पूर्णपणे बदलली असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत हनी ट्रॅपअंतर्गत लष्करातील अधिकारी, जवान तसेच अन्य पुरुषांना फसवले जात असल्याचे समोर आलेले आहे. पण यावेळी मात्र आयएसआयने यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या रुपात महिलेलाच हनी ट्रॅपमध्ये फसवले आहे की काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

तपास संस्थांपुढे आव्हान

ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी पैशांसाठी केली की यामागे अन्य काही कारण होते हे अद्याप समोर आलेले नाही. भारतात हनी ट्रॅपची प्रकरणं काही नवी नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांत समोर आलेली प्रकरणं आणि अशा प्रकरणात वापरण्यात आलेल्या युक्ती यामुळे तपास संस्थांपुढे आव्हान उभे टाकले आहे. गेल्या दशकभरात हनी ट्रॅपची शेकडो प्रकरणं समोर आलेली आहे. यामध्ये आतापर्यंत सैन्यदलातील कर्मचारी, वैज्ञानिक, नोकरशाहा, राजकीय नेते यांना लक्ष्य करण्यात आलंय.

 अलीकडची प्रकरणं कोणती?

याआधी 2023 मध्ये महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने डीआरडीओचे वैज्ञानिक प्रदीप कुरुळकर यांच्यावर पाकिस्तानी एजंट्सना संवेदनशील माहिती पुरवरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं. 2022 साली राजस्थानच्या पोलिसांनी सैन्यातील जवान शांतीमय राणा यांना हेरगिरीच्या आरोपांखील अटक केलं होतं. या दोन्ही प्रकरणात हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक झाली होती.

हनी ट्रॅप कसा असतो?

वेगवेगळ्या गोष्टींचे प्रलोभन देऊन एखाद्या व्यक्तीला फसवले जाते, यालाच हनी ट्रॅप म्हणतात. अगोदर हनी ट्रॅपसाठी भेट, शारीरिक जवळीक याचा वापर केला जायचा. आता मात्र डिजिटल युगात हनी ट्रॅपची पद्धत बदलली आहे. आजघडीला सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स यांच्या मदतीने हनी ट्रॅपचं जाळं टाकलं जातं. ज्याला लक्ष्य करायचंय त्याच्याशी अगोदर संपर्क साधला जातो, त्यानंतर त्याचा विश्वास संपादन केला जातो. खोटी सोशल मीडिया खात्यांचा वापर करून हनी ट्रॅपचं जाळं टाकलं जातं.