AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Malhotra News: ज्योती मल्होत्रा हीचे आयएसआय हँडलरशी Whatsapp चॅट,’या’ शब्दांमुळे वाढला संशय

हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटमध्ये कोडवर्ड्स समोर आले आहे. NIA, IB आणि हरियाणा पोलिस एकत्रितपणे तिची कसून चौकशी करीत आहेत.

Jyoti Malhotra News: ज्योती मल्होत्रा हीचे आयएसआय हँडलरशी Whatsapp चॅट,'या' शब्दांमुळे वाढला संशय
| Updated on: May 20, 2025 | 7:28 PM
Share

हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ( YouTuber Jyoti Malhotra ) वर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. आयएसआय तिचा वापर भारतीय गुप्तचरांची ओळख करण्यासाठी करत होती असे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा ( NIA), इंटेलिजन्स ब्युरो ( IB ) आणि हरियाणा पोलिस या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करीत आहेत. सध्या ज्योतीला पाच दिवसांच्या कोठडी मिळालेली आहे.

‘प्रोटोकॉल’ आणि ‘अंडरकव्हर एजंट’

ज्योतीचा तपास करणाऱ्या आयबीला ज्योती आणि ISI हँडलर अली हसन यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅट सापडले आहे.

या व्हॉट्सएप चॅटमध्ये ‘प्रोटोकॉल’ आणि ‘अंडरकव्हर एजंट’ सारख्या शब्दांचा उल्लेख झाला आहे. एका संभाषणात हसन अली याने विचारले की,’ जेव्हा तु अटारी बॉर्डरवर होती तेव्हा कोणाला प्रोटोकॉल मिळाला ? त्यास उत्तर देताना ज्योती हीने म्हटले की,” मला नाही मिळाला.” नंतर ती पुन्हा म्हणाली की,” ते एवढे मुर्ख नव्हते.” या संभाषणाने एजन्सींचा संशय वाढला आहे. भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे की आयएसआय तिला भारतीय एजंटांची ओळख करण्यासाठी दिशा-निर्देश देत असावी

वैसाखीच्या सणाला पाकिस्तानचा दौरा

ज्योती मल्होत्रा हिने 2023 मध्ये 324व्या वैसाखी पर्व सणाला पाकिस्तानचा दौरा केला होता.तेव्हाच तिचे संबंध पाक अधिकाऱ्यांशी बनणे सुरु झाले होते. तपासात हेही उलगडले की तिचे संभाषण पाक दुतावासातील अधिकारी एहसान दार उर्फ दानिश याच्याशी झाले होते. ज्यास भारताने अलिकडेच १३ मे रोजी ‘persona non grata’ घोषीत करुन त्यास देशाबाहेर हुसकावून लावले होते. चौकशीत गोलमोल उत्तरं

ज्योतीला यांच्या संपर्कासंबंधात विचारले असता तिने सुरुवातीला ताकास सूर लावू दिला नाही. आणि माहीती देण्यास इन्कार दिला. परंतू तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की ती लागोपाट चौकशीत गोलमोल उत्तरं देत आहे आणि तथ्यांना लपवत आहे.

पहलगाम हल्ल्या आधीचा व्हिडिओ चर्चेत

२२ एप्रिलच्या पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ देखील चर्चेत आला आहे. त्यात तिने हल्ल्याचा दोष पर्यटकांच्या माथी मारला आहे. आणि हल्ल्यास भारतीय संरक्षण यंत्रणांना जबाबदार धरले आहे. या व्हिडीओतील तिच्या संशयास्पद बोलणे आणि भारतीय यंत्रणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची चौकशी होत आहे. सध्या एजन्सी ज्योती मल्होत्रा हीने जाणून बुजून की अजाणतेपणी आयएसआयची मदत केली की ती हेरे म्हणून त्यांना मदत करत होती याची चौकशी केली जात आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.