AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या पुत्रासोबत दुर्घटना कशी घडली? तो व्हिडीओ अखेर समोर!

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महानआर्यमन यांच्यासोबत एक दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Video : केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या पुत्रासोबत दुर्घटना कशी घडली? तो व्हिडीओ अखेर समोर!
mahanaaryaman scindia accident videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 06, 2026 | 9:57 PM
Share

Mahanaryaman Accident Video : मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महानआर्यमन सिंधिया यांच्यसोबत दुर्घटना घडली. सोमवारी (5 जानेवारी) लोकांना कारमधून अभिवादन करत असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांच्या छातीला दुखापत झाली. या दुर्घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून त्यांना सोमवारीच डिस्चार्ज मिळालेला आहे. दरम्यान या दुर्घटनेचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावह व्हायरल होत आहे. लोकांना अभिवादन करत असताना महानआर्यमन यांच्या छातीला दुखापत झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार महानार्यमन सोमवारी मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस या विधानसभा मतदारसंघात एका युवकांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. ते एका महाविद्यालयात क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेले होते. संमेलनाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ते जमलेल्यांना अभिवादन करण्यासाठी कारच्या सनरुफमधून उभे राहिले होते. ते लोकांना अभिवादन करत होते. परंतु कारच्या चालकाने अचानकपणे ब्रेक दाबले. त्यामुळे कार जागेवरच थांबवली. यामुळे महानआर्यमन यांचा तोल गेला आणि त्यांच्या छातीला सन रुफची एक बाजू लागली.

40 मिनिटानंतर सुट्टी

ही घटना घडल्यानंतर महानआर्यमन यांना छातीत त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. 40 मिनिटांनंतर डॉक्टरांनी महानआर्यमन यांना डिस्चार्ज दिला. त्यांच्या स्नायुंना दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिली असून छातीला लावण्यासाठी बेल्टदेखील दिला आहे. मंगळवारी त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ईसीजी, एक्स-रे अशा सर्व चाचण्या केल्या

महानआर्यमन सिंधिया हे मध्य प्रदेश क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. दुर्घटना झाल्यानंतर त्यांना कोणताही त्रास जाणवत नव्हता. परंतु थोड्या वेळाने छातीत त्रास होत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांच्यावर लगेच जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी, एक्सरे काढण्यात आला. त्यानंतर सर्व चाचण्या करून त्यांना सुट्टी देण्यात आली.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....