AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : 35 लाखांची बॅग, 21 लाखांचे घड्याळ, कंगना राणौत यांचा संसदेतील लुक व्हायरल; छत्रीची किंमत वाचून चकित व्हाल!

कंगना यांच्या हातात काळ्या रंगाची Hermès Birkin Togo Leather बॅग असल्याचे बोलले जात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या लक्झरी हँडबॅग्समध्ये Birkin बॅगची गणना केली जाते.

Kangana Ranaut : 35 लाखांची बॅग, 21 लाखांचे घड्याळ, कंगना राणौत यांचा संसदेतील लुक व्हायरल; छत्रीची किंमत वाचून चकित व्हाल!
kangana ranautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 10:15 PM
Share

Kangana Ranaut Watch Purse Price : अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झी तरुणाईवर राणौत यांनी सडकून टीका केली होती. वाद झाल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही कंगना राणौत नियमितपणे सहभागी होत आहेत. अधिवेशनात सहभागी होत असताना त्यांनी परिधान केलेल्या साड्यांची तसेच त्यांच्या पर्सची देशभरात चर्चा होत आहे. त्यांनी तब्बल 35 लाख रुपयांची पर्स आणि 21 लाख रुपयांची घडी घातल्याचे बोलले जात आहे.

कंगना राणौत यांच्या अधिवेशनातील उपस्थितीपेक्षा त्यांच्या स्टायलिश आणि लक्झरी लूकची अधिक चर्चा होत आहे. संसद परिसरात कंगना यांचा पारंपरिक साडीतील अंदाजात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या लूकमधील महागड्या अॅक्सेसरीजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

निळ्या रंगाची साधी साडी

सध्या कंगना यांच्या एका लुकची सगळीकडेच चर्चा होतेय. त्यांनी हलक्या आकाशी निळ्या रंगाची साधी साडी परिधान केली होती. सोबतच त्यांनी पांढऱ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. त्यांचा हा पारंपरिक लूक अगदी साधा वाटत होता. परंतु त्यांच्या हातातील लक्झरी हँडबॅग मात्र सगळीकडे चर्चेचा विषय ठरली.

घड्याळाची किंमत तब्बल 21 लाख रुपये

कंगना यांच्या हातात काळ्या रंगाची Hermès Birkin Togo Leather बॅग असल्याचे बोलले जात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या लक्झरी हँडबॅग्समध्ये Birkin बॅगची गणना केली जाते. उपलब्ध माहितीनुसार, या बॅगची किंमत तब्बल 35 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बॅगसोबतच त्यांच्या मनगटावरील Rolex घड्याळानेही लक्ष वेधून घेतले. चॉकलेट ब्राउन डायल असलेल्या या घड्याळाची किंमत सुमारे 21 लाख रुपये असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये केला जातोय. विशेष म्हणजे, कंगना यांच्या हातातील छत्रीही चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या छत्रीची किंमत सुमारे 6,100 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

कंगना यांना संसदेत महागड्या आणि ब्रँडेड अॅक्सेसरीजसह पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्या अनेकदा त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत आलेल्या आहेत. यावेळीही त्यांच्या संसद परिसरातील लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण