15 प्रश्नांनी उघड केला 21 दिवसांचा प्लान; सासऱ्याच्या हत्येच्या कटात शालू अडकली
कानपूरमधील विनीत मिनोचा हत्याकांडाचे गूढ उकललं आहे. सून शालू हिनेच सासऱ्याच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आलं. तिने विशाल नावाच्या माजी कर्मचाऱ्याला ६ लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर शालूने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील औषधांचे व्यापारी विनीत मिनोच हत्याकांडाचं गूढ आतात उकललं आहे. त्यांचा खून दुसरा तिसरं कोणी नाही तर त्याच्या स्वत:च्या सुनेनेच करवला असं समोर आलं. शालू या महिलेनेच आपल्या सासऱ्याच्या हत्येचं षडयंत्र रचल्याची धक्कादायक माहितती समोर आल्याने सगळेच हादरले. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 21 दिवसांपूर्वी विनीत मिनोचा यांच्या हत्येचा प्लान रचण्यात आला होता. त्यानंतर घराबाहे फूलप्रूफ प्लानही आखण्यात आला. ओरिजनल चावीच्या मदतीने डुप्लीकेट चावी बनवण्यात आली. सूनबाई शालेनू विनीत यांचा माजी कर्मचारी विशालला 6 लाख रुपयांची सुपारी दिली. या हत्येसाठी 5 सप्टेंबर ही तारीखही शालूनेच निवडली. सोमवारी पोलिसांनी एक ते दीड तास शालूची कसून चौकशी केली, त्याचदरम्यान तिने सर्व गोष्टी सांगत गुन्हा कबूल केला. मात्र तिच्या या कबुलीमुळे कुटुंबियांनाही प्रचंड धक्का बसलाय. शॉपिंग करता करता शालून तिच्या सासऱ्यांना संपवण्याचा प्लान केला. तर या हत्याकांडात विनीत यांच्या मुलाचाही समावेश आहे का,याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
रविवारी विनीत मनोचा यांच्या हत्येनंतर झालेल्या चकमकीत पकडण्यात आलेल्या हरबंश मोहल येथील विशाल गौतम आणि राजकिशोर यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विनीत यांची सून शालू हिच्या सांगण्यावरूनच त्यांची हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. त्याच रात्री पोलिसांनी शालूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सकाळी कुटुंबीय तसेच रतन आर्बिट अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक मदन सिंह यांना बोलावण्यात आलं.
किंचाळत दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी सुरुवातीला शालूची चौकशी केली. मात्र, मी कोणत्याही कटात सहभागी नाही, असं म्हणत ती सहभाग नाकारत राहिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती सुब्रत, सासू पुनीता, विनीत यांचा भाऊ आणि आरोपी विशाल गौतम यांच्यासमोर तिची चौकशी केली. कुटुंबीयांसमोर पोलिसांनी शालूला 15 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पुरावे तिच्यासमोर ठेवल्यानंतर ती खचली आणि अखेर किंचाळत तिने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून तुरुंगात रवानगी केली.
अशी झाली प्रश्नोत्तरं
पोलिसांनी शालूची चौकशी सुरू केली तेव्हा मी निर्दोष आहे, असं ती सांगत राहिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीय, आरोपी आणि सुरक्षा रक्षक या सर्वांना समोरासमोर बसवलं. पोलिसांनी शालूला पहिला प्रश्न विचारला, तेव्हा तिने तो पूर्णपणे फेटाळून लावला. दुसऱ्या प्रश्नावर मात्र ती अडखळली आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. “उत्तर दे. सांग शालू, तू या सगळ्यात सहभागी नाहीस” असं पती, सासू आणि दीर तिला म्हणत राहिले. शालूने त्यांच्याकडे पाहिले आणि शांत राहून नजर खाली केली. त्यामुळे तिच्यावर केलेले आरोप खोटे नाहीत, हे कुटुंबियांनाही समजलं.
पोलिसांनी विचारलेले 15 प्रश्न आणि उत्तरं
● पोलीस : तुमच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं विशालने सांगितलं
● शालू : तो खोटं सांगतोय
● पोलीस : डुप्लीकेट चावी बनवण्यासाठी ओरिजनल किल्ली तुम्ही दिली, असं विशाल म्हणाला.
● शालू : मी कोणतीही किल्ली दिली नाही.
● पोलीस : तुम्ही 6 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं विशाल आणि राजकिशोरने सांगितलं
● शालू : सुपारी दिली असतील तर पैसेही दिले असतील, ते जप्त झाले का ?
● पोलीस : म्हणजे तुम्ही सासऱ्यांच्या हत्येची सुपारी दिली नाही
● शालू : बिलकूल नाही
● पोलीस : विशाल हा शिवम असल्याचं सांगू एंट्री करण्यासाठी तुम्ही सेक्युरिटी गार्डला फोन का केला ?
● शालू : मी फोन केला नव्हता
● पोलीस : तुमचा सीडीआर आमच्याकडे आहे आणि सेक्युरिटी गार्ड मदन सिंहने देखील हेच सांगितलं
● शालू : काहीच उत्तर दिलं नाही
● पोलीस : गुमटी येथे तुम्ही 3 वेळा विशालला भेटलात, त्याचं फुटेज आमच्याकडे आहे.
● शालू : काहीच उत्तर नाही
● पोलीस : तुमचं विशालशी सतत बोलणं होत होतं. तुमच्या दोन्ही नंबरांचं सीडीआर आमच्याकडे आहे.
● शालू : काहीच उत्तर दिलं नाही
माझं नव्हे, पतीचं घे नाव
पोलीस चौकशीत विशालने दावा केला की, हत्येचा कट शालूने रचला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, हत्येसाठी सहा लाख रुपयांमध्ये सौदा ठरला होता. त्यापैकी दोन लाख रुपये घटनेच्या दिवशी, तर उर्वरित चार लाख रुपये 15 दिवसांनंतर देण्याचं ठरलं होतं. पुढे विशालने असाही दावा केला की, पकडला गेलास तर माझं नाव घेऊ नकोस, तर (माझा) पती सुब्रतला जबाबदार ठरवं, असं शालूने त्याला सांगितलं. मात्र, सुब्रतचे नाव घेण्याची त्याची हिंमत झाली नाही.