AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro Max महागणार ? कधी होणार लाँच, भारतासह अमेरिका, ब्रिटनमध्ये किती असेल किंमत ?

ॲपलचा नवा आयफोन 18 प्रो मॅक्स आणि बहुप्रतिक्षित फोल्डेबल आयफोन अल्ट्रा लवकरच लॉन्च होत आहे. 'सरप्राइज अँड शाइन' इव्हेंटमध्ये हे फोन सादर होण्याची शक्यता आहे. लॉन्चपूर्वीच या मॉडेल्सच्या किमतींबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत.

iPhone 18 Pro Max महागणार ? कधी होणार लाँच, भारतासह अमेरिका, ब्रिटनमध्ये किती असेल किंमत ?
iPhone 18 Pro Max
| Updated on: Sep 08, 2026 | 4:35 PM
Share

ॲपल कंपनीचा फोन वापरण्याची बरीच क्रेझ दिसून येते. त्याबद्दलच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बुधवारी सरप्राइज अँड शाइन या इव्हेंटमध्ये ॲपल कंपनी त्यांचा नवा फोन, आयफोन 18 प्रो सीरीज यासह त्यांचा सर्वात पहिला फोल्डेबल फोन लाँच करू शकते. याचं नाव अल्ट्रा असू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या लाँचपूर्वी आयफोन 18 प्रो मॅक्सच्या किमतींबाबात विविध अंदाज व्यक्त केले जात आहे. भारतात याची सुरूवात 1.55 ते 1.60 लाखापर्यंत जाऊ शकते. तर फोल्डेबल आयफोन अल्ट्राची प्राईस ही 2 लाखापेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये किती असेल किंमत ?

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये iPhone 18 Pro Max च्या किमतीबाबत वेगवेगळे अंदाज समोर आले आहेत. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांच्या सांगण्यानुसार, वाढत्या उत्पादन खर्चाचा काही भाग Apple स्वतः  उचलू शकते आणि अमेरिकेत फोनची किंमत सुमारे 100 डॉलर्सनी वाढू शकते. ब्रिटनमध्येही सुमारे 100 पौंडांची वाढ होण्याचा अंदाज आहे. IDC नेदेखील जवळपास याच पातळीवरील किंमतवाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, जेफ पु यांच्या जुन्या अंदाजानुसार किंमत 1,199 डॉलरवरून वाढून 1,449 ते 1,499 डॉलरपर्यंत जाऊ शकते, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या नव्या अंदाजानुसार किंमत सध्याच्या पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.

यूएईमध्येही वाढू शकते किंमत

यूएईमध्येही iPhone 18 Pro Max ची किंमत वाढू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्याच्या अंदाजानुसार त्याची किंमत सुमारे 5,135 दिरहम असू शकते, तर मागील मॉडेलची किंमत सुमारे 4,955 दिरहम होती. काही अधिक आक्रमक अंदाजांमध्ये ही किंमत 6,399 दिरहमपर्यंत जाऊ शकते, असंही सांगण्यात आलं. मात्र, हे सर्व बाजारातून समोर आलेले अंदाज आहेत आणि Apple कडून अद्याप या किमतींची अधिकृत पुष्टी केलेली नाही. मेमरी कंपोनंटच्या वाढत्या किमती, हे संभाव्य दरवाढीमागील प्रमुख कारणांपैकी एक मानलं जातंय.

फोल्डेबल आयफोनची किती असेल किंमत ?

Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone ला आतापर्यंत iPhone Ultra या नावाने संबोधलं जातंय. सुरूवातीच्या रिपोर्ट्समध्ये अमेरिकेतील त्याची किंमत 2 ते 2,500 डॉलरच्या दरम्यान असू शकते, असं सांगितलं जातंय. मात्र, नव्या लीकनुसार किंमत या रेंजच्या खालच्या टप्प्याच्या जवळ राहू शकते. व्होडाफोन इजिप्तच्या कथित लिस्टिंगमध्ये या फोनची किंमत 1,55,750 इजिप्शियन पाउंड असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 2.89 लाख रुपये इतकी होते. ऑस्ट्रेलियातील एका कॅरिअरच्या लीकमध्ये किंमत 3,699 ऑस्ट्रेलियन डॉलर असल्याचे नमूद करण्यात आले आहे, जी भारतीय चलनात सुमारे 2.52 लाख इतकी आहे.

आयफोन 18 प्रो मॅक्सची भारतात किंमत

भारतात आयफोन 17 प्रो मॅक्सची सुरूवातीची किंमत 1, 49, 900 रुपये आहे. तर आयफोन 18 प्रो मॅक्सच्या 256 जीबी स्टोरेजवाल्या मॉडेलची किंमत 1,54,900 रुपये ते 1,59,900 असेल असा अंदाज आहे. स्टोरेजच्या नुसार त्याची किंमत 1.8 लाखांपर्यंत जाऊ शकते. काही विश्लेषाकांनी असा अंदाज व्रत्वला की काही व्हेरिएंट्सची किंमीत 20 हजारांनी वाढू शकते. आता नवा आयफोन कधी लाँच होणार, आणि कधी हातात येतो याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं