AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, राजकारणात खळबळ

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित माजी मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले तरी ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. अखेर त्यांच्याविरोधात बंगळुरुच्या फास्टट्रॅक कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे.

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, राजकारणात खळबळ
कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार
| Updated on: Jun 13, 2024 | 9:37 PM
Share

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर अटकेटची टांगती तलवार आहे. त्यामागील कारणही अगदी तितकच मोठं आणि फार संवेदनशील आहे. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. येडियुरप्पा यांनी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने हा आरोप केला आहे. पीडितेच्या आईने पोलिसात या प्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत येडियुरप्पा यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कर्नाटकचं सीआयडीचं पथक तपास करत आहेत. येडियुरप्पा यांना याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण ते हजर राहिले नाहीत. यामुळे बंगळुरुच्या फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. या वॉरंटनंतर आता येडियुरप्पा यांना पोलिसांकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी गेल्या महिन्यात आरोप केले होते. ही महिला 54 वर्षांची होती. तिचं गेल्या महिन्यात एका खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झालं, अशी माहिती समोर येत आहे. याच महिलेने आपल्या लेकीवर येडियुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी येडियुरप्पा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण येडियुरप्पा चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फास्ट्रट्रॅक कोर्टात येडियुरप्पा यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे.

येडियुरप्पा यांची हायकोर्टात धाव

दुसरकीडे बी. एस. येडियुरप्पा यांनी संबंधित प्रकरणात आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत, असा दावा केला आहे. तसेच या प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी येडियुरप्पा यांना काल (12 जून) नोटीस बजावली होती आणि त्यांना तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी हा खटला रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात धाव घेतली. सुनावणीला उपस्थित राहण्याच्या नोटीसला उत्तर देताना येडियुरप्पा यांनी 17 जूनला होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहू, असं सांगितलं आहे.

पीडितेच्या भावाची येडियुरप्पा यांना अटक करण्याची मागणी

या प्रकरणी पीडितेच्या भावाने काल हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून त्याने माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अटक करण्याची मागणी केली होती. संबंधित घटनेला अनेक महिने झाल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. येडियुरप्पा यांना अटक करुन अद्याप चौकशी झालेली नाही. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार पीडितेच्या भावाने याचिकेत केली. तसेच कोर्टाने येडियुरप्पा यांच्या अटकेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी पीडितेच्या भावाने याचिकेत केली आहे.

संबंधित प्रकरणावरुन वातावरण तापल्यानंतर आता कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वेळ पडली तर सीआयडी माजी मुख्यमत्री येडियुरप्पा यांना अटक करेल. त्यांना नोटीसला उत्तर द्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.