AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पोलीस महासंचालकाच्या हत्येने खळबळ, पत्नीकडे संशयाची सुई, हत्येमागे धक्कादायक कारण

माजी आयपीएस अधिकाऱ्याची राहत्या निवासस्थानी हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीवरच हत्येचा संशय आहे.

माजी पोलीस महासंचालकाच्या हत्येने खळबळ, पत्नीकडे संशयाची सुई, हत्येमागे धक्कादायक कारण
FORMER DGP MURDER
| Updated on: Apr 20, 2025 | 8:59 PM
Share

आपल्या शेजारील राज्य कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या बंगुळुरुतील एचएसआर लेआऊटजवळील घरात रक्तात माखलेला त्यांचा मृतदेह सापडला आहे. या हत्येमागे कोणी चोर किंवा इतर बाहेरी व्यक्ती नसून त्यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला आहे. त्यांच्या हत्येमागच्या कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. ओम प्रकाश हे साल १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते साल २०१५ मध्ये कर्नाटकचे ३८ वे पोलीस महासंचालक बनले होते.

मुळचे बिहारच्या चंपारण येथील रहिवासी असलेल्या माजी आयपीएस ओमप्रकाश निवृत्तीनंतर त्यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानी राहात होते. या घटनेत पतीची हत्या केल्यानंतर पोलीसांना त्यांच्या पत्नीनेच कॉल करुन वर्दी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. त्यांच्या पत्नी या मानसिक आजारातून आपल्या पतीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात पत्नीची अधिक चौकशी केली जात आहे.

मूळचे चंपारण येथील रहिवासी

कर्नाटक राज्याचे ३८ वे डीजीपी असलेल्या ओमप्रकाश यांनी हे पद सांभाळण्याच्या आधी होमगार्डचे कमांडन्ट जनरल आणि नागरीक संरक्षण विभागाचे संचालक तसेच अग्निशमन तसेच आपात्कालीन सेवांचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. कर्नाटक कॅडरचे आयपीएस असलेले ओमप्रकाश मूळचे बिहारातील चंपारण जिल्ह्याचे होते. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात कर्नाटकातील बेल्लारीच्या हरपनहल्ली उप मंडळाचे एएसपी म्हणून केली होती.

 दंगल नियंत्रण करण्यात त्यांची महत्वाची भूमिका

१९९३ च्या  दरम्यान भटकल येथील  दंगल नियंत्रण करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होते. त्यांनी राज्य सतर्कता आयोग आणि कर्नाटकच्या लोकायुक्ताचे एसपी आणि चिकमगलुरु, शिवमोग्गा आणि उत्तर कन्नड येथील कॅप्टन म्हणून काम केले होते. त्यांनी डीआयजी ( प्रशासन ), डीआयजी-उत्तर क्षेत्र, डीआयजी-प्रशिक्षण आणि डीआयजी अग्निशमन दल ही पदेही भूषवली होती. त्यांनी सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक म्हणून आणि परिवहन आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.