दारु माफियांच्या हल्ल्यात पोलीस शिपायाचा मृत्यू, योगींकडून 50 लाखांची मदत

| Updated on: Feb 10, 2021 | 7:59 AM

उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये (Kasganj) पुन्हा बिकरु येथील घटनेच्या (Bikroo Kand) पुनरावृत्तीचा प्रयत्न करण्यात आला.

दारु माफियांच्या हल्ल्यात पोलीस शिपायाचा मृत्यू, योगींकडून 50 लाखांची मदत
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये (Kasganj) पुन्हा बिकरु येथील घटनेच्या (Bikroo Kand) पुनरावृत्तीचा (Police Sipahi Murdered And Police Sub-Inspector Badly Injured) प्रयत्न करण्यात आला. वॉरंटीला ताब्यात घ्यायला गेलेल्या पोलिसांना आधी कैद करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरिक्षक अशोक आणि शिपाई देवेंद्र यांना बेदम मारहाण केली. यामध्ये पोलीस शिपायाचा मृत्यू झाला तर पोलीस निरिक्षक अशोक यांची प्रकृती गंभीर आहे (Police Sipahi Murdered And Police Sub-Inspector Badly Injured).

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या कासगंज (Kasganj) येथे अवैध दारु बनवण्यात (Illegal Liquor) येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दारु माफियांनी हल्ल चढवला. सिढपुरा पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरिक्षक आणि शिपायाला दारु माफियांनी बेदम मारहाण केली आणि त्यांची वर्दीही फाडली. माफियांनी पिहिले पोलिसांना कैदी बनवलं आणि त्यानंतर त्यांना गायब केलं. त्यानंतर पोलीस निरिक्षक अशोक कुमार रक्तबंबाळ अवस्थेत एका शेतात आढळून आले आणि शिपाई देवेंद्र यांचा मृतदेह दुसऱ्या ठिकाणाहून मिळाला.

पोलिसांनी सिढपुरा आरोग्य केंद्राजवळ शिपाई देवेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. माफियांनी जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या गंभीरतेला पाहता घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपींचा तपास सुरु आहे. उपनिरिक्षक अशोक यांची परिस्थिती गंभीर आहे (Police Sipahi Murdered And Police Sub-Inspector Badly Injured).

‘मुख्यमंत्री योगींकडून घटनेचं मॉनिटरिंग’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी जखमी पोलिसांना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच सीएम योगीने आरोपींवर एनएसए लावण्याचे आदेश दिले आहेत. कासगंजचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंहने सांगितलं की या पूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नजर आहे. त्यांनी मृतक देवेंद्र यांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका नातेवाईकाला नोकरी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री स्वत: या घटनेची मॉनिटरिंग करत आहेत.

Police Sipahi Murdered And Police Sub-Inspector Badly Injured

संबंधित बातम्या :

एकाने शटर उचकटले, दोघांनी दुकान फोडले, मेडिकल दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद 

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ