एकाने शटर उचकटले, दोघांनी दुकान फोडले, मेडिकल दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद 

धुळ्यात चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडल्याची घटना समोर आली आहे. (Dhule medical shop robbed)

एकाने शटर उचकटले, दोघांनी दुकान फोडले, मेडिकल दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद 

धुळे : धुळे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धुळ्यात चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Dhule medical shop robbed)

धुळे शहरातील मिल परिसरात साई दर्शन कॉलनीच्या कॉर्नरवर एक मेडिकल दुकान आहे. संजय भावसार यांच्या मालकीचे हे दुकान असून आई हिंगलाज असे या दुकानाचे नाव आहे. या दुकानात काल रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या मेडिकल दुकानाजवळ तीन चोरटे बाईक घेऊन आले. त्यानंतर या चोरट्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली. यानंतर या तिघांपैकी एकाने मेडिकल दुकानाचे शटर उचकटले. हे शटर उघडल्यानंतर दोघे जण आत गेले. तर यातील एक जण तिथेच बाहेर थांबला. यानंतर या चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम चोरी करुन घटनास्थळावरुन पळ काढला.

धुळ्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी गस्त घालत नसल्याने हे प्रकार वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

धुळे शहरात गेल्या 4 ते 5 महिन्यात अनेक चोऱ्या झाल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनाचा या चोरट्यांवर अंकुश आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे चोर मस्त आणि पोलीस प्रशासन सुस्त, अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. (Dhule medical shop robbed)

संबंधित बातम्या : 

पुणे नगर हायवेवर दिवसा ढवळ्या गोळीबार, लोणीकंद परिसरात भीतीचं वातावरण

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

Published On - 4:01 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI