Azadi Ka Amrit Mahotsav : कोमाराम भीम यांनी जल, जंगल आणि जमीनचा नारा देत निजाम आणि ब्रिटिश राजवटीविरोधात दिला जोरदार लढा, जाणून घ्या अधिक

| Updated on: Aug 01, 2022 | 4:32 PM

कोमाराम भीम यांनी बंड पुकारल्यानंतर सर्वात अगोदर जंगलातील सर्व साधनसंपत्तीवर जंगलात राहणाऱ्या लोकांचा हक्क आहे, यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी जाहिर करत जल, जंगल, जमीनचा नारा दिला.

Azadi Ka Amrit Mahotsav : कोमाराम भीम यांनी जल, जंगल आणि जमीनचा नारा देत निजाम आणि ब्रिटिश राजवटीविरोधात दिला जोरदार लढा, जाणून घ्या अधिक
Follow us on

मुंबई : अत्याचार आणि अन्यायाविरोधात स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलीयं. यापैकी असेच एक क्रांतिवीर म्हणजे कोमाराम भीम (Komaram Bheem) हे होते. हे एक आदिवासी वीर योद्धा होते. त्यांनी जल, जंगल आणि जमिनीचा नारा देऊन हैदराबादच्या निजाम आणि ब्रिटिश राजवटीविरोधात जोरदार लढा देत निजाम आणि ब्रिटिशांना (British) पळो की सळो करून सोडले होते. विशेष म्हणजे यादरम्यान त्यांनी स्वत:चा एक देखील निर्माण केला होता. ज्याचे नाव गोरिल्ला सैन्य असे होते. युद्धात त्यांनी अनेकदा हैदराबादच्या सैन्याचा पराभव केला. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आरआरआर (RRR) चित्रपटातील ज्युनियर एनटीआरचे पात्र या कोमाराम भीम यांच्यापासून प्रेरित होते, ही खरोखरच अत्यंत मोठी बाब आहे.

लहानपणापासूनच संघर्ष करण्यास केली सुरूवात

कोमाराम भीम यांचा जन्म 1901 मध्ये आसिफाबाद जिल्ह्यातील संकापल्ली गावात झाला. त्यावेळी हा जिल्हा हैदराबादमध्ये होता पण आता तो तेलंगणात आहे. त्यांच्या वडिलांचे नाव कोमाराम चिन्नू होते. गोंड आदिवासी जमातीत जन्मलेल्या कोमाराम यांची आर्थिक परिस्थिती तशी अत्यंत हालाकिचीच होती. पैशांची चणचण घरात कायमच असल्याने कोमाराम भीम हे शिक्षण देखील घेऊ शकले नव्हते. त्यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. बाहेरच्या जगाशीही त्यांचा कधीही खास संबंध तसा आलाच नव्हता.

हे सुद्धा वाचा

इंग्रजांनी केले देशाच्या नैसर्गिक संपत्तीवर अतिक्रमण

जेव्हा इंग्रज देशाच्या नैसर्गिक संपत्तीवर अतिक्रमण करत होते, हैदराबादचे निजाम इंग्रजांशी करार करून राज्य करत होते. त्यामुळे आदिवासींवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत होते. पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जात असे. न दिल्याने अत्याचार करण्यात आले. त्यावेळी आदिवाशी समाज्यावर इंग्रजांनी आणि ब्रिटिश खूप जास्त अन्याय केला. हे पाहून कोमाराम भीम यांनी बंड सुरू केला. इतकेच नाही तर हैदराबादला आसफ शाही घराण्यापासून वाचवू अशी मोठी घोषणाच कोमाराम भीम यांनी करून टाकली.

कोमाराम भीम यांनी बंड पुकारत दिला मोठा नारा

कोमाराम भीम यांनी बंड पुकारल्यानंतर सर्वात अगोदर जंगलातील सर्व साधनसंपत्तीवर जंगलात राहणाऱ्या लोकांचा हक्क आहे, यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी जाहिर करत जल, जंगल, जमीनचा नारा दिला. इतिहासकारांच्या मते, कोमाराम भीम यांनी हैदराबादचे निजाम आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा जाहीर केला, त्या वेळी देशात स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होती, तेव्हा भगतसिंगांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कोमाराम भीम यांच्यावर भगतसिंगचा प्रभाग जास्त होता.

हैदराबादच्या निजामांची आदिवासी गावात वसुली

हैदराबादच्या निजामाने आदिवासी गावात वसुली करताना आदिवासींवर अत्याचार केल्यावर कोमाराम भीमाने त्यांची हत्या केली. यानंतर मात्र त्यांना गाव सोडून जंगलात राहवे लागले. कोमाराम भीम यांच्या बंडाच्या अनेक बातम्या निजामांना मिळाल्या. निजामाने भीम यांना पकडण्यासाठी अनेक वेळा सैन्य पाठवले. इकडे कोमाराम भीमानेही आपली गोरिल्ला सेना तयार केली होती, जी प्रत्येक वेळी सैन्याशी मुकाबला करत जंगलात लपून बसत असे, त्यामुळे निजामांच्या सैन्याचा पराभव होत राहिला.

ज्युनियर एनटीआरचे पात्र कोमाराम भीम यांना समर्पित

1928 ते 1940 पर्यंत कोमाराम भीम यांनी निजाम आणि इंग्रजांच्या नाकामध्ये दम आणला होता. 1940 मध्ये निजामाने पुन्हा सैन्य पाठवले आणि फसवणुक करत कोमाराम भीम यांची हत्या करण्यात आली. कोमाराम भिम हे आजही आदिवासींच्या हृदयात जिवंत आहेत, अनेक ठिकाणी त्यांची देवताप्रमाणे पूजा केली जाते. तेलगू चित्रपटातील RRR या चित्रपटातील ज्युनियर एनटीआरचे पात्र कोमाराम भीम यांना समर्पित आहे, हा चित्रपट काल्पनिक असला तरी, मुख्य पात्र भीम आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष लक्षात घेऊन लिहिलेला आहे.