Sologamy : स्वत:शीच लग्न केलं तर सेक्शुअल गरजांचं काय? क्षमा बिंदू तोऱ्यात म्हणते, इटस नन ऑफ यूअर बिजनेस !

| Updated on: Jun 10, 2022 | 10:46 PM

या सर्वांची पर्वा न करता, क्षमी अत्यंत आनंदी आहे आणि आयुष्यातील या खास क्षणाचा आनंद घेत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने एका फोटोखाली लिहिले आहे की, "मी स्वतःवर हळद लावली, काल माझे लग्न झाले, काल मी स्वतःशीच नात्यात अडकले."

Sologamy : स्वत:शीच लग्न केलं तर सेक्शुअल गरजांचं काय? क्षमा बिंदू तोऱ्यात म्हणते, इटस नन ऑफ यूअर बिजनेस !
क्षमा बिंदू
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : स्वतःशी लग्नाची घोषणा करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या क्षमा बिंदू (Kshama Bindu)चे काल अखेर लग्न पार पडले. देशातील अशा पहिल्या लग्नात अडथळे येण्याच्या भीतीने बिंदूने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधी लग्न (Marriage) केले. पंडितांनी लग्नाला नकार दिल्यानंतर, क्षमाने मंत्रांचे रेकॉर्डिंग वाजवून आपल्या भांगेत सिंदूर भरला. मंगळसूत्र घातले आणि नंतर सात फेरे घेतले. लाल पोशाख घातलेले क्षमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मीम्सही व्हायरल होत आहेत. तर काही लोक विचित्र प्रश्नही विचारत आहेत. सुहागरात, हनिमून आणि मुलांच्या जन्माशी संबंधित प्रश्न क्षमाला विचारण्यात येत आहेत. एका युजरने सेक्शुअल गरजां (Sexual Need)बाबत काय असं विचारलं आहे.

काय म्हणाली क्षमा बिंदू ?

यावेळी एका युजरने तिला प्रश्न विचारला आहे की, स्वत:शीच लग्न केलं तर सेक्शुअल गरजांचं काय? यावर क्षमाने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘हेटरोसेक्युअल मॅरेजमध्येही इतके चांगले काम सुरु आहे असे मला वाटत नाही. ही माझी वैयक्तिक सेक्शुअल गरज आहे. याबाबत विचारणंही चुकीचे आहे. तर मी स्वतःला कशी सेक्शुअली सॅटिसफाईड करेन, इट्स नन ऑफ युअर बिझनेस’, अशा शब्दात क्षमाने प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

तथापि, या सर्वांची पर्वा न करता, क्षमी अत्यंत आनंदी आहे आणि आयुष्यातील या खास क्षणाचा आनंद घेत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने एका फोटोखाली लिहिले आहे की, “मी स्वतःवर हळद लावली, काल माझे लग्न झाले, काल मी स्वतःशीच नात्यात अडकले.” गुजरातच्या वडोदरा येथे झालेल्या या लग्नात काही मित्र आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. (Kshama bindu gave an unequivocal answer to users about sexual needs)