AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asam Baby Change : हॉस्पिटलने चुकून बदलले नवजात बालक; तीन वर्षांनंतर घडला ‘हा’ चमत्कार अन् खर्‍या मातेच्या अश्रूंचा बांध फुटला!

याप्रकरणी बारपेटा पोलीस ठाण्यात कलम 120 (बी) आणि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी डीएनए चाचणीसाठी बारपेटा न्यायालयात याचिका दाखल केली. या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

Asam Baby Change : हॉस्पिटलने चुकून बदलले नवजात बालक; तीन वर्षांनंतर घडला 'हा' चमत्कार अन् खर्‍या मातेच्या अश्रूंचा बांध फुटला!
हॉस्पिटलने चुकून बदलले नवजात बालकImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 6:59 PM
Share

बारपेटा : आई आणि मुलाचं नातं जन्मापासून नव्हे, तर जन्माआधीपासूनच अधिक घट्ट असते. त्यामुळे मुलाला जन्म दिल्यानंतर त्या नवजात बाळाचा चेहरा कधी पाहतेय, याची प्रचंड ओढ प्रत्येक मातेला असते. अशावेळी जर जन्म दिलेले मूल आपल्यापासून काही क्षण नव्हे, काही काळ नजरेसमोर नसेल तर…? ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे. आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. हॉस्पिटलने चुकून (By mistake) नवजात बाळा (Infant)ला त्याच्या खर्‍या आईऐवजी दुसर्‍या महिलेच्या ताब्यात दिले. ते बाळ त्या महिलेच्या कुशीत एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्षे (Three Years) राहिले. पण नियतीने अखेर त्या बाळाला खरी आई म्हणजेच जन्मदात्रीची भेट घडवून दिली. तीन वर्षांनंतर बाळाला जन्मदात्री भेटली. पोटच्या मुलाला पाहताच त्या जन्मदात्रीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला.

दोघी महिलांच्या नावात साम्य असल्याने घडली घटना

आसामधील बारपेटा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तीन वर्षापूर्वी दोन गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. नजमा खानम आणि नजमा खातून या दोघीही एकाच वॉर्डमध्ये दाखल होत्या. यापैकी एका महिलेने मेलेल्या बाळाला जन्म दिला तर दुसऱ्या महिला नजमा खानम यांनी सुदृढ बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुतीच्या चार तासांनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नजमा यांचे बाळ दुसऱ्या महिलेच्या ताब्यात दिले. तर दुसऱ्या महिलेचे मयत मूल नजमा यांच्या नातेवाईकांकडे दिले. दोघी महिलांच्या नावात साम्य असल्यामुळे ही चूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अशी उघडकीस आली घटना

अॅड. अब्दुल मन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नजमा यांच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की नजमा यांनी एका सुदृढ बालकाला जन्म दिला असून ते बालकाचा मृत्यू झालेला नाही. त्यानंतर तीन दिवसांनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयातील प्रसुती झालेल्या महिलांची यादी चेक केली. या यादीमध्ये दोन महिलांची नावात साम्य आढळून आले, नजमा खानम आणि नजमा खातून. दोघींनीही दोन बालकांना जन्म दिला. त्यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर खानम कुटुंबीयांनी बारपेटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत याप्रकरणी तपास करण्याची विनंती पोलिसांना केली.

याप्रकरणी बारपेटा पोलीस ठाण्यात कलम 120 (बी) आणि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी डीएनए चाचणीसाठी बारपेटा न्यायालयात याचिका दाखल केली. या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार सदर बाळ त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. दोन्ही महिलांच्या नावात साम्य असल्याने भूलचुकीने ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.