Breaking : कोलकातामध्ये बांग्लादेश दूतावासाबाहेर गोळीबार, महिलेची हत्या करुन पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या!

कोलकातामधील बांग्लादेश दूतावासाबाहेर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला. त्याने केलेल्या बेछूट गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या पोलिसानेही आत्महत्या केलीय.

Breaking : कोलकातामध्ये बांग्लादेश दूतावासाबाहेर गोळीबार, महिलेची हत्या करुन पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या!
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:10 PM

नवी दिल्ली : कोलकातामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना आज पाहायला मिळाली. कोलकातामधील (Kolkata) बांग्लादेश दूतावासाबाहेर (Bangladesh Embassy) एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला. त्याने केलेल्या बेछूट गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या गोळीबारानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या (Suicide) केलीय. पोलीस गोळीबारात मृत्यू झालेली महिला गाडीवर रस्त्यावरुन जात होती. त्याचवेळी त्या पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस कर्मचारी जवळपास एक तासापासून त्याच परिसरात फिरत होता. त्याचं नाव चोदुप लेपचा असं होतं. तो दार्जिलिंगचा रहिवासी होता आणि आर्म्स पोलीसच्या 5 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता अशी माहिती मिळतेय.

महिलेचा मृत्यू, सुरक्षारक्षकाची आत्महत्या, एक जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पोलीस कर्मचाऱ्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती. ही घटना दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली. या घटनेत बांग्लादेश दूतावासाच्या सुरक्षारक्षकासह दोन लोकांचा मृत्यू झालाय, तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेछूट गोळीबारात स्कुटीवरुन जात असलेल्या महिलेच्या छातीवर गोळी लागली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर सुरक्षारक्षकाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्त्यावरुन जात असलेल्या अन्य एका महिलेच्या कमरेला गोळी लागल्याची माहिती मिळतेय. त्या महिलेची स्थिती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षकाने आपल्या ऑटोमॅटिक रायफलमधून अचानकपणे फायरिंग सुरु केलं. कमीतकमी 8 ते 10 राऊंड फायरिंग झालं. या गोळीबारात स्कूटीवर जात असलेल्या महिलेच्या छातीवर गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दरम्यान, हा प्रकार का घडला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार घटनेनंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु करण्यात आलाय. बांग्लादेश दूतावासाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत मत मांडण्यात आलेलं नाही.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.