AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीला काळजी बापाची, लालूंसाठी लेक किडनी दान करणार…

माझे वडिल माझ्यासाठी सर्वस्व आहेत, त्यामुळे माझ्या शरीरातील एक छोटासा भाग मी त्यांना देत असल्याची भावना रोहिणी आचार्यनी सांगितले.

लेकीला काळजी बापाची, लालूंसाठी लेक किडनी दान करणार...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 11, 2022 | 6:55 PM
Share

नवी दिल्लीः राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे आता लालू प्रसाद यादव यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य आपली एक किडनी वडिलांना दान करणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने गुरुवारीच आपल्या वडिलांसाठी मी किडनी दान करणार असल्याचे जाहीर केले होते. आपली एक किडनी वडिलांना देणार असल्याचे तिने ट्विट करुन माहितीही दिली होती.

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी ट्विट करुन एक किडनी वडिलांना देणार असल्याचे सांगत त्यांनी आपला आणि वडिलांचा एक जुना फोटोही शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती खूप लहान असल्याचे दिसत आहे.

रोहिणी आचार्य यांनी ट्विटवर लिहिले आहे की, मला वाटतं की, माझ्या शरीरातील एक मासाचा तुकडा आहे, जो मी माझ्या बापाला देऊ इच्छिते.

मी वडिलांसाठी काही करु शकते. त्यामुळे तुम्हीही प्रार्थना करा की सगळं काही व्यवस्थित होईल, आणि माझे वडिल पुन्हा येतील आणि येथील माणसांसाठी ते पुन्हा आवाज उठवतील. पुन्हा एक तुमच्या शुभेच्छांसाठी माझ्याकडून शुभेच्छा असंही त्यांनी सांगितले.

तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये रोहिणी यांनी लिहिले आहे की, या जगात मला हाक मारणारे, मला मायेने हाक मारणारे, बोलवणारे माझे वडिल माझ्यासाठी सगळं काही आहेत.

त्यामुळे माझ्या आयुष्यातील एक छोटासा भाग देऊन त्यांच्या आयुष्याला थोडं फार काही देऊ शकले तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आई आणि वडिल या जगात देवासारखे आहेत, आणि त्यांची सेवा करण्यासाठी सगळ्या आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे असंही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढेही लिहिले आहे की, माझे आई वडिल माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुमच्या सदिच्छांमुळे मला धीर आला आहे.

त्यामुळे मी सगळ्यांची आभारी आहे. या गोष्टीमुळे मला तुमचं सगळ्याचं प्रेम आणि माया मिळत आहे. आणि आता या क्षणी खूप भावूक झाले आहे. तुमच्या या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे मी तुमची आभारही व्यक्त करते असंही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी