AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुंकर मारायचा, मग लैंगिक शोषण.. ‘लाफ्टर शेफ’तून चर्चेत आलेला हा बाबा कोण? चीड आणणारं प्रकरण

फुंकर मारा.. आजार पळवा... बाबाचं भ्रमजाल..., 'लाफ्टर शेफ'तून चर्चेत आलेला हा बाबा कोण? महिलांसोबत करायचा तरी काय? अत्यंत चीड आणणारं प्रकरण... बाबाचं सत्य समोर आल्यानंतर अनेकांना बसला मोठा फटका....

फुंकर मारायचा, मग लैंगिक शोषण.. 'लाफ्टर शेफ'तून चर्चेत आलेला हा बाबा कोण? चीड आणणारं प्रकरण
Hariom yadav
| Updated on: Jun 20, 2026 | 11:29 AM
Share

अशोक खरात याच्यानंतर अनेक फसवणूक करणाऱ्या बाबांचं काळं सत्य समोर आले. आता स्वतःला चमत्कारी म्हणवणाऱ्या, ‘बॉटल बाबा’ उर्फ हरिओम महाराज याला देखील अटक करण्यात आली आहे. फक्त बाबा नाहीतर, त्याच्या सर्व काळ्या कामांमध्ये सहभागी असलेल्या दीपक यादव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. बाबावर असे आरोप आहेत की, आश्रमातील एका खोलीत बाबाने एक महिलेसोबत गैरवर्तन केलं. एवढंच नाही तर, विरोध केल्यानंतर महिलेला मारहाण केली, शिवाय तिला जीवेमारण्याचा प्रयत्न देखील बाबाने केला.. असं सांगण्यात येत आहे.

कॅन्सरवर गुणकारी औषध द्यायचा बाबा…

जवळपास दोन वर्षांपूर्वी हरिओम यादव याचं नाव समोर आलं. हरिओम यादव याच्या ‘दरबारा’त अवघ्या 20 रुपयांना मिळणाऱ्या ‘अमृत पाणी’ आणि लवंगांच्या वापराने कॅन्सर व मधुमेहासारखे गंभीर आजार बरे होऊ शकतात, असा दावा करणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्याच्या समर्थकांचं असं म्हणणं होतं की, या ‘बाबां’वर देवी कालीची विशेष कृपा होती आणि त्या दैवी शक्तीच्या बळावर ते असाध्य आजारही बरे करू शकत होते.

सांगायचं झालं तर, भोगनीपूर तहसील क्षेत्रातील या ‘शक्तिपीठा’वर आठवड्यातून दोनदा ‘दरबार’ भरवला जात असे, जिथे केवळ उत्तर प्रदेशातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही मोठ्या संख्येने लोक यायचे. या सभेला उपस्थित राहणाऱ्या भाविकांना पाणी, लवंग आणि तेलाची बाटली दिली जायची आणि त्याद्वारे त्यांच्या समस्यांचे निवारण होईल, असा दावा केला जायचा. अनेक लोक याला चमत्कार मानत असले, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्यांनी मात्र या दाव्यांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आता त्याच दरबारात मोठी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरैया जिल्ह्यातील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. धर्मिक अनुष्ठाना दरम्यान, बाबाने महिलेला सांगितली की, तुझ्या वाईट शक्तींची सावली आहे…, त्यातून मुक्त होण्यासाठी पूजा करावी लागेल.. यासाठी बाबाने महिलेकडून तब्बल 40 हजार रुपये देखील घेतले.

महिलेने केलेल्या आरोपांनुसार, 15 जून रोजी पूजा करण्यासाठी महिलेला आश्रमात बोलावलं आणि एका खोलीत घेऊन जाण्यात आलं… जेथे तिच्यासोबत लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली. विरोध केल्यानंतर महिलेला मारहाण केली, शिवाय तिला जीवेमारण्याचा प्रयत्न देखील बाबाने केला. अखेर त्या संकटातून महिलेने स्वतःची सुटका केली आणि पोलिसांशी संपर्क साधला… आता पोलीस संबंधित प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

‘लाफ्टर शेफ’तून चर्चेत आलेला हा बाबा

‘बॉटल बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिओम यादव याने केवळ आपल्या कथित चमत्कारांमुळेच नव्हे, तर टेलिव्हिजनच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण केली होती. तो ‘लाफ्टर शेफ्स: अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या लोकप्रिय मनोरंजन कार्यक्रमात देखील आलेला. तिथे त्याने वि ‘बॉटल चमत्कार’ दाखवले होते. मात्र, आता त्याच्यावर करण्यात आलेल्या गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांमुळे त्याच्या सार्वजनिक प्रतिमेला धक्का लागला आहे. पोलीस याप्रकरणी आता कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
वर्षावर जाणारच, मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई
'वर्षा'वर तर जाणारच, जरांगेंचा थेट इशारा
जरांगे उपोषणावर ठाम: सदावर्ते यांची अटकेची मागणी
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे उपोषण; सदावर्ते म्हणतात,