
लोकसभा निवडणुकीचे सर्व 543 जागांचे निकाल लागले आहे. निवडणूक आयोगाने सर्वच 543 लोकसभा मतदार संघातील निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 240 जागा भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा आता काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. परंतु काँग्रेसला सेंच्युरी गाठता आली नाही. त्यातच राहुल गांधी दोन मतदार संघातून विजयी झाल्यामुळे एक ठिकाणावरुन ते राजीनामा देणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. 2019 मध्ये भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपला जोरदार फटका बसला आहे तर काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला हक्काचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मोठा फटका बसला आहे. यंदा राजस्थानमधून साथ मिळाली नाही. महाराष्ट्रातून जोरदार पिछेहाट झाली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. यामुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहे त्याची माहिती