AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha election : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Lok sabha election 2024 : भाजप पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा लवकरच होऊ शकते. भाजपने आतापासूनच रणनीती आखली आहे. पंतप्रधान मोदी कोणत्या मतदारसंघातून लढणार आहेत जाणून घ्या.

Loksabha election : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
| Updated on: Feb 24, 2024 | 7:43 PM
Share

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही क्षणी आता निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भारतीय जनता पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीत गुंतला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची २९ फेब्रुवारीला बैठक होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर भाजप आपल्या पहिला १०० उमेदवारांची घोषणा करु शकते. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाची देखील घोषणा होऊ शकते.

पंतप्रधान मोदी कुठून लढणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा या मतदारसंघातून मैदानात असतील. कारण यूपी हे महत्त्वाचं राज्य आहे. येथून सर्वाधिक खासदार येतात. यूपीमधील जागांवर भाजपच्या मुख्यालयात बैठक देखील झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. ज्या जागांवर पराभव झाला त्या जागांवर देखील चर्चा करण्यात आली. भाजपने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशसह आणखी पाच राज्यांबाबत देखील रणनीती आखली जाणार आहे. यामध्ये  छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. राजस्थान सोडले तर इतर चार राज्यांच्या विधानसभेत भाजपची सत्ता नाहीये. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजपला अधिक काम करावे लागणार आहे.

भाजपकडून पहिल्या यादीत महत्त्वाच्या नेत्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपने यंदा ३७० जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. तर एनडीएला ४०० जागा मिळतील असा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून तशी रणनीती देखील आखली गेली आहे.

मोदींच्या नेतृत्वात लढवणार निवडणुका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे सर्वात मोठे स्टार प्रचारक असणार आहेत. मोदींच्याच नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा निवडणुका लढवणार आहे. त्यानंतर अमित शाह, स्मृती इराणी, नितीन गडकरी, राजनाथ सिंग हे देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रचार करताना दिसणार आहेत.

Follow Us
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.