
LPG Cylinder Shortage Predictions: अमेरिका आणि इस्त्रायल-इराण युद्ध अजून काही दिवस संपण्याची चिन्ह नाहीत. या युद्धाच्या झळा भारतीय लोकांना बसल्या आहेत. गॅस टंचाई, गॅस तुटवड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना भर उन्हात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. या युद्धामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि वाहतूक व्यवस्था बाधित झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका ज्योतिषाची एक जुनी पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टनुसार देशात गॅसचा तुटवडा होईल असा दावा त्याने केला होता. दाव्यानुसार ही पोस्ट सप्टेंबर 2025 मधील आहे. ती आता एकदम व्हायरल झाली आहे. या ट्वीटची देशभरात चर्चा सुरू आहे.
5 महिन्यांपूर्वीच ट्वीटरवर भविष्यावाणी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ज्योतिषी प्रशांत किनी यांनी त्यांचे सप्टेंबर 2025 मधील एक ट्वीट पुन्हा पोस्ट केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मार्च 2026 नंतर भारतात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे येतील. पुरवठ्यावर मोठा परिणाम दिसून येईल. त्यांनी ज्यावेळी हे भाष्य केले त्यावेळी युद्ध अथवा गॅस संकटाचे कोणतेही संकेत मिळालेले नव्हते. आता मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी करण्यात आल्याच्या तर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या देशभर लांबच लांब रांगा लागल्याची वृत्त समोर येत आहेत.
India will face fuel and natural Gas shortage after March 2026…
Supply chain disrupt…!!??— Prashanth Kini (@AstroPrashanth9) September 27, 2025
या 11 मार्च रोजी किनी यांनी त्यांचे जुने ट्विट पुन्हा एकदा शेअर केले आहे. त्यात जवळपास 5 महिन्यांपूर्वी आपण गॅस टंचाई आणि पुरवठा प्रभावित होण्याविषयी लिहिल्याचा दावा केला आहे. हे ट्विट आता व्हायरल झाले आहे. त्यांच्या ट्वीटवर सोशल मीडियात कमटेंसचा पाऊस पडला आहे.
मग युद्ध कधी थांबणार ते पण सांगायचं की
ज्योतिषी प्रशांत किनी यांच्या या ट्वीटवर कमेंटचा पाऊस पडला आहे. या भाकीताविषयी लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. नेटझिन त्यांना अनेक प्रश्नही विचारत आहेत. तर काहींनी अगोदरच जर तुम्ही हे भाकीत केले, तर त्याच पोस्टमध्ये युद्ध कधी थांबणार यांचाही अंदाज वर्तवायला हवा होता असे म्हटले आहे. तर एका युझरने देशात इंधन आणि गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही, लोक भीतीपोटी अतिरिक्त गॅस सिलेंडर खरेदी करत असल्याचा दावा केला. नैसर्गिक गॅसची अतिरिक्त खेप आल्यावर लागलीच ही गर्दी गायब होणार असल्याचा दावाही काही जण करत आहेत. आता या ज्योतिषाने इतरही भाकीत करावे असा आग्रह कमेंटमध्ये केल्याचे दिसून येत आहे.