AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्यासारखे हजार पती…,’ बोलताच संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली, कोर्टाने मात्र शिक्षा घटवली

एका पती आणि पत्नीच्या भांडणात शब्दालाशब्द वाढत एका पत्नीने उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या पतीने शेजारी ठेवलेला दगडाने तिच्या वार केल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हायकोर्टाने आरोपीला दिलासा देत शिक्षा कमी केली आहे.

'तुझ्यासारखे हजार पती...,' बोलताच संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली, कोर्टाने मात्र शिक्षा घटवली
husband and wife war
| Updated on: Jun 29, 2026 | 8:21 PM
Share

पती – पत्नीच्या नात्यात अनेकदा भांड्याला भांडे लागत असते. अनेकदा ही भांडणे दुसऱ्या दिवशी लगेच मिठतातही. मात्र,एका घटनेत पतीच्या रोजच्या मारहाणीला कंठाळलेल्या पत्नीने पतीला तुझ्यासारखे १००० ठेवू शकते असे आव्हान दिले. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा थेट खून केला. या प्रकरणात मध्य प्रदेशातील हायकोर्टाने एक महत्वाचा निकाल दिला आहे. पत्नीने पतीला असे बोलणे गंभीर असून त्यास अचानक उकसवल्याचे म्हणता येते असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आरोपी पतीची शिक्षा कोर्टाने कमी केली आहे.

हे प्रकरण मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. येथे साल २०२१ मध्ये पती-पत्नी यांच्यात झालेल्या वादात पत्नी किरण हीचा मृत्यू झाला होता. बचाव पक्षाने म्हटले होते की भांडणाच्या वेळी पती शिवा याला त्याच्या पत्नीने म्हटले की तुझ्यासारखे १००० पती ठेवू शकते ! यामुळे संतापलेल्या पतीने जवळ ठेवलेला दगड उचलून तिच्या डोक्यात टाकला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ट्रायल कोर्टाने या प्रकरणात आरोपी पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम – ३०४ अंतर्गत दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. नंतर खालच्या कोर्टाच्या निकालाविरोधात आरोपीने हायकोर्टात आव्हान दिले.

हायकोर्टात आरोपीला दिलासा

मध्य प्रदेशातील हायकोर्टाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अवनिंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले होते. पत्नीचा हा शेरा पतीच्या आत्मसन्मान आणि त्याच्या अस्तित्वावर अप्रत्यक्ष प्रहार मानला जाऊ शकतो. असे शब्द परिस्थितींनुसार कोणा व्यक्तीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवू शकतात. पतीने घटनेनंतर स्वत:च पोलिस आणि अन्य लोकांना घटलेल्या घटनेची कल्पना दिली याचाही विचार कोर्टाने निकाल देताना केला. हत्या जर पूर्व नियोजित आणि कट रचून केली असती तर आरोपीचे वर्तन सामान्य मानले गेले नसते. आरोपी स्वत: सोबत कोणतेही हत्यार घेऊन त्याने मारहाण केली नाही. घटनेच्या वेळी मिळालेल्या दगडाने त्याने प्रहार केला.

गंभीर आणि अचानक उकसवणे मानले जाऊ शकते

कोर्टाने आरोपीने कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले आणि शिक्षेनंतरचे त्याचे वर्तन या सर्वांचा विचार करुन कोर्ट म्हणाले की हत्या अचानक झाली आणि आधीपासून हत्येची कोणतीही योजना नव्हती. यास गंभीर आणि अचानक उकसवणे मानले जाऊ शकते. या सबबीवर कोर्टाने आरोपीच्या शिक्षेला भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ भाग – I ने बदलून कलम ३०४ – भाग II केले. आणि आरोपींची आजन्म कारावासाची सजा घटवून सात वर्षांच्या कठोर कारावासात परिवर्तित केली.

Follow Us
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला