नवराच नसेल तर…? तीन तास रुग्णवाहिकेची वाट पाहून थकली, नवऱ्याला रुग्णालयात नेण्यासाठी तिने केला असा काही जुगाड की…
आजारी पतीची अवस्था बिकट झाली होती. तीन तास वाट बघूनही अँब्युलन्स आली नाही. अखेर त्या पत्नीने पतीचा जीव वाचवण्यासाठी असा जुगाड केला, ज्याचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

भोपाळ | 22 सप्टेंबर 2023 : सध्या मध्यप्रदेशमध्ये छिंदवाड़ा येथील विकास मॉडेलची खूप चर्चा सुरू आहे. पण आता याच मॉडेलचे एक कुरूप चित्र समोर आले आहे. ज्या नागरिकांसाठी विकास करण्याचा दावा सत्ताधारी करत असतात, त्याच नागरिकांना साध्या, गरजेच्या सुविधा न मिळाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका महिलेल्या तिच्या आजारी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी साधी अँब्युलन्सही (ambulance) मिळू शकली नाही. अखेर तिने स्वत:चं डोकं लढवलं आणि जुगाड करत पतीला रुग्णालयात घेऊन गेली. आधुनिक सावित्रीच्या या रुपामुळे तिचं कौतुक होत असलं तरी लोकांना सामान्य सुविधाही देऊ न शकणाऱ्या प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे लोक हा व्हिडिओ शेअर करत भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही टॅग करत आहेत आणि प्रश्न विचारत आहेत. हे प्रकरण छिंदवाड्यातील जुन्नरदेवचे आहे. येथे राहणारे हेमंत नागवंशी हे भोपाळ येथे मजुरीचे काम करायचे. मात्र नुकत्याच झालेल्या एका अपघातामध्ये त्यांचा पाय कापला गेला. छिंदवाडा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने हेमंतचा पाय सडू लागला. गुरुवारी त्यांती पत्नी गीता यांनी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका सेवेला फोन केला. सकाळपासून त्या अँब्युलन्ससाठी फोन करत होत्या, मात्र तीन तासवाट पाहूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ना अँब्युलन्स आली.
अखेर त्यांनीच हिंमंत गोळा केली केली आणि पतीला हातगाडीवर झोपवले आणि धक्का देत, मजल-दरमजल करत करत त्या रुग्णालयापर्यंत पोहोचल्या. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी कसेतरी प्रिस्क्रिप्शन मिळाले, मात्र डॉक्टर अनुपस्थित असल्याने त्यांना उपचारांसाठी देखील बराच लढा द्यावा लागला . जुन्नरदेव सामुदायिक आरोग्य केंद्र येतथे अँब्युलन्स नसल्याने गीता यांना हा त्रास सहन करावा लागला.
रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्यांना आमदार निधीतून अँब्युलन्स तर मिळाली पण तिची सेवा अद्याप सुरू झाली नाही. प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिका सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र वाहने नसतील तर अडचणी निर्माण होतातच असे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
