नवी नवरी झाली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, जाणून घ्या काय होते कारण?
महा कुंभात पोहोचलेल्या ममता वशिष्ठला किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर करण्यात आले आहे. ममता वशिष्ठचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून वयाच्या सहाव्या वर्षापासून ती उपासना आणि अध्यात्मात गुंतली आहे. ती वयाच्या पंधराव्या वर्षापासून रामकथा आणि श्रीमद् भागवत कथा ही सांगते.

दिल्लीत राहणारी ममता वशिष्ठ आता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी तिचे पिंडदान आणि पट्टाभिषेक केला आहे. दोन महिन्यांपूर्वीच ममता वशिष्ठचे दिल्लीतील उद्योगपती संदीप वशिष्ठ सोबत लग्न झाले. ती महामंडलेश्वर झाल्यामुळे तिचा नवरा, सासू-सासरे खूप झाले आहे. त्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महामंडलेश्वर झाल्यावरही ममता वशिष्ठ तिच्या जुन्या नावाने ओळखल्या जाईल. लहानपणापासूनच तिचा सनातन धर्माकडे कल असल्याचा तिने सांगितले. कुटुंबात राहूनही ती उपासना आणि धार्मिक अध्यात्मात अधिकाधिक वेळ घालवत असे. अवघी वय वर्षे 25 असलेल्या ममता वशिष्ठने बीएड आणि एमएडचे शिक्षण घेतले आहे ती सांगते की वयाच्या सातव्या वर्षापासून ती उपासने सोबतच वेद, पुराण, श्रीरामचरितमानस आणि श्रीमद् भगवद्गीता यांचा अभ्यास करत आहेत.
पंधराव्या वर्षी सांगितली होती राम कथा
धर्मग्रंथ वाचण्या सोबतच ती कथाही सांगते. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने पहिल्यांदा श्री राम कथा सांगितली आणि तेव्हापासून तिने रामकथा आणि श्रीमद् भागवत कथन करायला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या राज्यात 380 हून अधिक कथा केल्या आहे. तिने सांगितले की दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये तिचे लग्न झाले होते. महामंडलेश्वर होण्याबाबत तिने पती आणि कुटुंबीयांना सांगितले तेव्हा तिला आधी असे वाटले होते की ती लोक नकार देतील मात्र असे काही घडले नाही.




पती आणि कुटुंबीयांनी दिली साथ
या निर्णयात त्यांचे पती संदीप आणि भाऊ विशू यांच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाने तिला पाठिंबा दिला आहे. शिवाय सनातनच्या प्रचारासाठी पुढे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महामंडलेश्वर ममता वशिष्ठच्या म्हणण्यानुसार धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात काम करत असताना तिची महाराष्ट्रातील किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी पार्वती नंद गिरी धुलिया यांच्याशी सुमारे सहा वर्षांपूर्वी भेट झाली. यानंतर ती किन्नर आखाड्यात सामील झाली आणि सनातन धर्माचा प्रचार करू लागल्या आहे. तिचे काम पाहिल्यानंतर तिला किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर चे पद आणि जबाबदारी दिली आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)