AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट महानआर्यमन सिंधियांकडून मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ७६ वा वाढदिवस साजरा करत असून देशभरातील अनेक माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

Narendra Modi: मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट महानआर्यमन सिंधियांकडून मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
| Updated on: Sep 17, 2026 | 3:27 PM
Share

आज, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६ वा वाढदिवस आहे. हा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी भाजप देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. गुरुवारी विविध ठिकाणी सेवा आणि जनसहभागाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजप १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा’ आणि १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोकांनी आपापल्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ लावावा, असे आवाहन भाजपने केले आहे. पंतप्रधान मोदींचे मूळ गाव असलेल्या वडनगर आणि वाराणसी येथून बाईक रॅलीलाही सुरुवात झाली. अमित शाह यांनी वडनगर येथून बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच मध्यप्रदेश क्रिकेट असोशिएशनचे प्रेसिंडट महानआर्यमन सिंधिया यांनी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

महानआर्यमन सिंधिया यांनी ट्विट करत मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “देशाचे यशस्वी पंतप्रधान, माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रसेवेच्या मार्गावर न थांबता आणि न थकता निरंतर पुढे जाण्यासाठी तुमचे जीवन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे. ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो.” असे ते म्हणाले.

अवघ्या २९ वर्षांच्या वयात महान आर्यमन सिंधिया हे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. १९५७ नंतरचे ते सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ते ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील असून, त्यांचे वडील ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय मंत्री आहेत, तर त्यांचे आजोबा माधवराव सिंधिया यांनीही एमपीसीएचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

आर्यमनने २०२२ मध्ये ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे (GDCA) उपाध्यक्ष म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच वर्षी तो MPCA चा लाईफटाईम सदस्य बनला. २०२४ मध्ये त्याने मध्य प्रदेश टी२० लीग सुरू केली.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?