AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका तिकिटाच्या किंमतीत येईल आलिशान फ्लॅट! या ट्रेन पुढे 7 स्टार हॉटेल फिक्क्या, चालता-फिरता राजमहल कोणता?

Most Expensive Train in India: भारतीय रेल्वे ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण लाखो प्रवासी या साधनातून रोज प्रवास करतात. अगदी लहानसहान गोष्टींपासून ते आधुनिक रूपडं परिधान करेपर्यंत रेल्वेत सर्व प्रयोग सुरू आहेत. पण या चालत्या-फिरत्या राजमहलाविषयी तुम्हाला माहिती आहे का?

एका तिकिटाच्या किंमतीत येईल आलिशान फ्लॅट! या ट्रेन पुढे 7 स्टार हॉटेल फिक्क्या, चालता-फिरता राजमहल कोणता?
सर्वात महागडी रेल्वेImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 01, 2026 | 2:23 PM
Share

Most Expensive Train in India: मुंबई अथवा उत्तर भारतातील रेल्वे पाहिल्यावर प्रचंड गर्दी, धक्काबुक्की आणि ट्रेन पकडण्यासाठीची कसरत आपल्याला घाबरवून टाकते. पण याविरुद्ध देशात पॅलेस ऑन व्हील्स म्हणून ओळखली जाणारी आलिशान रेल्वे धावते. भल्या भल्या फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलची चमक या रेल्वेपुढे फिक्की पडते. या रेल्वेचे सूट पाहाताच तुमच्या तोंडातून वॉव असाच शब्द निघतो. या चालत्या-फिरत्या राजमहलाविषयी फार कमी प्रवाशांना माहिती आहे. कोणती आहे ही आलिशान ट्रेन?

कोट्यवधींचा खर्च आणि शाही अंदाज

ही ट्रेन सजवण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रेल्वेतील सूट हे मॅक्सिकन फॅब्रिकने सजवले गेले आहेत. यामध्ये स्पा आणि इतर आलिशान सुविधा आहेत. महाराजा एक्सप्रेस असं या रेल्वेचं नाव आहे. 45 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात ही रेल्वे पहिल्यांदाच मे च्या तळपत्या उन्हात रुळावरून धावणार आहे. या रेल्वेत उदयपूरची थंडाई, जयपूरची कुल्फी आणि जैसलमेरचे खास ग्लुकॉन डी शरबत प्रवाशांच्या जीभेला चव आणेल. पण ही काही साधीसुधी ट्रेन नाही. या ट्रेनचं भाडं ऐकून अनेकांना चक्कर येते. या शाही प्रवासासाठी एका कॅबिनचे भाडे 10 लाखांपासून सुरू होऊन ते 23 लाख रुपयांपर्यंत जाते.(Maharajas Express Ticket Price) इतक्या पैशात तर शहरात एक फ्लॅट खरेदी करता येईल अथवा खेड्यात बंगला उभारता येईल.

सात रात्रींचा प्रवास आणि लाखोंचे भाडे

सप्टेंबर महिन्यापासून 7 रात्र आणि 8 व्या दिवसापर्यंत  (7 Nights Journey and Lakhs of Ticket Price) दिल्ली ते आगार आणि राजस्थानच्या प्रमुख भागाची सैर या रेल्वेतून करता येते. विशेष म्हणजे या महागड्या रेल्वेत पाऊल ठेवायलाही जागा नसते. इतका प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो. खास करून परदेशी पर्यटक आणि NRI अनेक महिने अगोदर या रेल्वेचे आसन बुक करतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ही रेल्वे स्वप्नासारखीच आहे. पण ज्याने या रेल्वेतून प्रवास केला, त्याला स्वर्गीय अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. पॅलेस ऑफ व्हील्स ही नावाप्रमाणेच एक शानदार आणि ऐटदार रेल्वे आहे. या रेल्वेचा प्रवास तुम्हाला आयुष्यभर कायम लक्षात राहतो.

डिस्क्लेमर: सदर माहिती ही विविध स्त्रोतांवर आधारीत आहे. टीव्ही 9 मराठी कोणताही दावा करत नाही.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं