जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, दोन अतिरेक्यांचा खात्मा, एक पाकिस्तानी

बँक मॅनजर, शिक्षिकेला त्यात जीव गमवावा लागलाय. प्रशासनानं टार्गेटवर असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली केलीय. पण अशी तात्पुरती केलेली व्यवस्था कायमची कशी होणार हा खरा सवाल आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, दोन अतिरेक्यांचा खात्मा, एक पाकिस्तानी
गेल्या काही काळात काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्यातImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 8:58 AM

जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) सध्या टार्गेट किलिंगमुळे (Target Killings) चर्चेत आहे. पण सोबतच भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलीस फोर्स जी कामगिरी बजावतंय त्याचीही जोरदार चर्चा आहे. काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातल्या जालुरा भागात लष्कर ए तोएबाच्या (Encounter) दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आलंय. हे दोन्ही अतिरेकी एन्काऊंटरमध्ये मारले गेलेत. यातला एक अतिरेकी हा पाकिस्तानी आहे. काल रात्री हे एन्काऊंटर सुरु झालं होतं. त्याचा शेवट दोन्ही अतिरेक्यांच्या खात्म्यानं झाला. पण अजूनही ऑपरेशन संपलेलं नाही. कारण तिसऱ्या अतिरेक्याचा शोध जंगलात सुरु आहे. दरम्यान कुपवाड्यातही एन्काऊंटर सुरु झालंय.

काश्मीरचे IGP विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मारले गेलेल्या अतिरेक्याचं नाव तुफैल आहे तर दुसऱ्या अतिरेक्याचं नाव हंजाला आहे. पाकिस्तानी अतिरेकी हा लाहौरचा असल्याचीही माहिती दिली गेलीय. अतिरेक्यांजवळ एक AK-47 रायफल तसच 5 मॅग्झिन जप्त करण्यात आलेत.

दोन दिवसांपूर्वीच हिजबुल कमांडरचा खात्मा

दोनच दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एक चकमक झाली होती. त्यात हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी कमांडर निसार खांडे मारला गेला. रिशीपोरा भागात ही घटना घडली. गेल्या काही काळात काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवायांनी डोकं वर काढलंय. त्याचाच भाग म्हणून टार्गेट किलिंग केल्या जातायत. पण लष्कर आणि स्थानिक पोलीस फोर्स जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत.

हे सुद्धा वाचा

डोडा जिल्ह्यात एक संशयीत अतिरेकी अटकेत

डोडा जिल्ह्यात एका संशयीत अतिरेक्याला काल अटक करण्यात आलीय आणि त्याच्या घरातून स्फोटकं जप्त करण्यात आलीत. अतिरेक्याचं नाव इरशाद अहमद असं आहे. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार धंडल कस्तीगढ भागात सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेत इरशाद अहमदला अटक करण्यात आलीय.इरशादच्या घरातून आईईडी मिळालेत.

10 दिवसात 10 टार्गेट किलिंग

अतिरेक्यांच्या टार्गेटवर सध्या स्थानिक हिंदू तसच तिथं कामासाठी आलेले मजूर आहेत. गेल्या 26 दिवसात टार्गेट किलिंगच्या 10 घटना घडल्यात. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधून पुन्हा एकदा पलायन सुरु झालंय. बँक मॅनजर, शिक्षिकेला त्यात जीव गमवावा लागलाय. प्रशासनानं टार्गेटवर असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली केलीय. पण अशी तात्पुरती केलेली व्यवस्था कायमची कशी होणार हा खरा सवाल आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.