कुख्यात नक्षलवाद्यासोबत 7 नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांना मोठे यश, चकमक तब्बल…

जोखा राव हा आंध्र ओडिशा सीमा (AOB) प्रदेशातील नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीशी संबंधित होता. तो नक्षलवादी कारवायांमध्ये तज्ज्ञ मानला जातो. संप्रेषण प्रणाली आणि तांत्रिक नेटवर्क तयार करण्यात पारंगत होता. मोठी मोहिम सुरक्षा यंत्रणांकडून राबवली जात आहे.

कुख्यात नक्षलवाद्यासोबत 7 नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांना मोठे यश, चकमक तब्बल...
Naxalites
| Updated on: Nov 19, 2025 | 12:39 PM

आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती पुढे येतंय. या चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाल्याची माहिती पुढे आली. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली भागात सुरक्षा दलाकडून दुसऱ्या नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे. बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याची मोठी माहिती पुढे येतंय. अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यांतील जंगलाच्या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी विरोधात मोहिम सुरू आहे. एक टॉप नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा यालाही ठार करण्यात मोठे यश सुरक्षा दलांना आले. एडीजी महेश चंद्र लड्ढा यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बुधवारीही कारवाई सुरू ठेवली. आज सकाळपर्यंत तीन महिला माओवाद्यांसह सात नक्षलवादी मारण्यात यश आले.

विशेष म्हणजे सुरक्षा दलांनी सकाळी 7 वाजल्यापासून नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई सुरू केली. लपून बसलेल्या नक्षलवाद्यामध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. ज्यामुळे परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली. मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख मेतुरी जोखा राव उर्फ ​​टेक शंकर अशी झाली. बाकी मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून असूनही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोखा राव हा आंध्र ओडिशा सीमा (AOB) प्रदेशातील नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीशी संबंधित होता. तो नक्षलवादी कारवायांमध्ये तज्ज्ञ मानला जातो. संप्रेषण प्रणाली आणि तांत्रिक नेटवर्क तयार करण्यात पारंगत होता. जोखा राव हा 20 वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या सततच्या कारवाईमुळे त्याच्या हालचाली मर्यादीत झाल्या. तो दक्षिण भारतात सक्रिय झाला होता आणि संघटनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत होता.

आंध्रप्रदेश चकमक झाल्यानंतर पोलिसांनी शहरामध्ये सक्रिय असलेल्या माओवाद्यांच्या तुकड्यांवर कारवाई केली यात दहा पुरुष आणि पाच महिलांना अटक करण्यात आले. केंद्रीय माओवाद अनुयायी संघटनेचे सदस्य असून “एल्लूर” च्या ग्रीन सिटीमधील एका घरात असल्याच्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. यांच्याकडून काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. माओवाद्यांच्या नेता हिडमा ठार झाल्यामुळे माओवादी संघटनेची दहशतता गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, तेलंगाना, आंध्रप्रदेश उडीसा या राज्यात कमी झालेली आहे.

केंद्रीय गृह विभागाच्या टार्गेटवर आता माओवाद्यांच्या नेता असलेला देवजी व गणपती या दोघांवर लक्ष आहे. माओवादी संघटनेत मोठी ओळख म्हणून देवजी व गणपती दोन मोठे चेहरे आता एक जंगल भागात सक्रिय आहेत. मार्च 2026 पर्यंत केंद्रीय गृह विभागाकडून माओवादी संघटनेला अल्टिमेट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आंध्र प्रदेश राज्यात आत्मसमर्पण करा अन्यथा ठार मारण्याचे रणनीती चार राज्यातील पोलीस करीत आहेत.