भारतावर मोठे संकट, हिमालयात मोठी आपत्ती, तज्ज्ञांचा झोप उडवणारा इशारा, नेपाळ,पाकिस्तानसह..

नुकताच मोठा अहवाल प्राप्त झाला. या अहवालाने भारताच्या टेन्शनमध्ये मोठी वाढ झाली. भारताला ज्याची भीती तेच घडताना दिसत आहे. एल निनोमुळे फक्त भारतच नाही तर भारतासोबत अन्य काही देशांवर मोठे संकट उभे आहे. याचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतावर मोठे संकट, हिमालयात मोठी आपत्ती, तज्ज्ञांचा झोप उडवणारा इशारा, नेपाळ,पाकिस्तानसह..
El Nino india
| Updated on: Nov 23, 2026 | 8:46 AM

भारतावर मोठे संकट गोंगावत आहे. आकाशात मोठ्या संख्येने ढग जमा होऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वी जी परिस्थिती नेपाळमध्ये उद्धभवली, तिच परिस्थिती भारतात होण्याची शक्यता आहे. हिवाळा अधिक भीषण होण्याचीही शक्यता आहे. त्यातच मोठे संकट एल निनोचे उभे आहे. हिमालयीन प्रदेशात हिवाळ्यात परिस्थिती अधिक घातक होण्याची शक्यता आहे. यादरम्यान एल निनो अधिक तीव्र होऊ शकतो. सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यानच पूर, भूक्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो. नेपाळपासून उत्तर भारताताली नद्यांवर याचा परिणाम होण्याचा अंंदाज आहे. नद्यांच्या पाणी तापळीत अचानक वाढ होऊ शकते. यासोबत ओला मोठा दुष्काळही पडू शकते. प्रशांत महासागरातील एल निनोचा परिणाम पावसावर बघायला मिळाला.

त्यातच आता मोठा इशारा देण्यात आला. नुकताच मिळालेल्या अहवालानुसार, एक शक्तिशाली एल निलो हिंद कुश हिमालय प्रदेशात सक्रिय झाला. तिथे सामान्यापेक्षा अधिक पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. हिवाळ्यात नेपाळमध्ये पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढू शकतो. फक्त नेपाळपुरतेच हे मर्यादित राहणार नाही तर याचा थेट फटका भारताला बसू शकतो.

Loading...

भारत आणि पाकिस्तान देखील याच्या कचाट्यात येतील. हिंद कुश हिमालय हिवाळी दृष्टिकोन 2026 असे नाव या अहवाला दिले आहे. काठमांडूस्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट, बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक फिजिक्स यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे.

या अहवालात भारत, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्यावेळी फक्त नेपाळपर्यंत हे संकट थांबले होते. पण यावेळी याच्या कचाट्यात अनेक देश येणार आहेत. मोठा इशारा देण्यात आला. रिपोर्टमध्ये मोठा इशारा देण्यात आला. उत्तर भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळच्या काही भागांत बर्फाचा थर नेहमीपेक्षा अधिक जाड असू शकतो. भूतान आणि पूर्व झिझांगच्या काही भागांत बर्फाचे आच्छादन नेहमीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us