AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का, याचिकेत तब्बल १४ त्रूटी, उद्या सुनावणीची शक्यता कमी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या राहुल गांधी आणि भारत आघाडीला सुरुवातीलाच धक्का बसला आहे.

राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का, याचिकेत तब्बल १४ त्रूटी, उद्या सुनावणीची शक्यता कमी
rahul gandhi
| Updated on: Oct 12, 2026 | 11:33 PM
Share

दिल्लीत सोमवारी इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदाता यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या ( एसआयआर ) विरोधात निदर्शने केली होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि विरोधी पक्षाने सुप्रीम कोर्टावर मार्च काढल्यानंतर सु्प्रीम कोर्टात जाऊन निवडणूक आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेत सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टारने एकूण १४ त्रूटी काढल्या आहेत. त्यामुळे आता या याचिकेला पुन्हा करावे लागणार असून उद्या या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधी आणि विरोधकांनी आज सर्वोच्च न्यायालयात मार्च काढला होता. या मार्चनंतर याचिका दाखल झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने या याचिकेत १४ तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. अहवालानुसार, याचिकेसोबत २२० रुपये न्यायालयीन शुल्क कमी भरण्यात आले होते. शिवाय, नऊ याचिकाकर्त्यांचे मुखत्यारपत्र जोडलेले नव्हते असेही सुप्रीम कोर्टाचे रजिस्टार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या लीगल टीमच्या जवळच्या सूत्रांनुसार, सर्वोच्च न्यायालय मंगळवारी राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. सूत्रांच्या मते, याचिकेत सध्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, ज्यांचे निराकरण केले जात आहे. यामध्ये कागदपत्रे आणि इतर औपचारिकतांशी संबंधित त्रुटींचा समावेश आहे. या त्रुटी दूर झाल्यावर आणि याचिकेवर पूर्णपणे पुनर्विचार झाल्यावरच सुनावणीची तारीख निश्चित केली जाऊ शकते. सध्या, काँग्रेसची कायदेशीर टीम आवश्यक दुरुस्त्या करण्यात व्यस्त आहे.

इंडिया अलायन्सचे खासदार मंगळवारी सायंकाळी ४ वाजता राहुल गांधी यांच्या ५, सुनहरी बाग रोड येथील निवासस्थानी जमणार आहेत. आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नेत्यांना आणि खासदारांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, इंडिया अलायन्सचे नेते आणि खासदारांव्यतिरिक्त काँग्रेसचे खासदार, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि नागरी समाजातील नेत्यांनाही चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

चहापान बैठकीनंतर पत्रकार परिषद

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी आयोजित केलेल्या चहापान बैठकीनंतर इंडिया अलायन्स एक संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित मुद्दा आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजित पत्रकार परिषदेमुळे मंगळवारी मोठे निदर्शने आणि आंदोलन होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, पत्रकार परिषदेत पुढील राजकीय रणनीती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर