घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, न्यायालयाला पाठवले बायकोचे प्रायव्हेट फोटो; चूक लक्षात येताच…

वाहिक जीवनात अशा प्रकारच्या चुका होतात. अशा चुका सुधारल्या पाहिजेत, असेही मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. दरम्यान, न्यायालयाने संबंधित व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या वकिलावर कोणतीही कारवाई केलेली

घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, न्यायालयाला पाठवले बायकोचे प्रायव्हेट फोटो; चूक लक्षात येताच...
divorce
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 9:19 PM

Divorce And Court : घटस्फोट घेण्याचे प्रमाण आजकाल खूपच वाढले आहे. विचार न जुळल्याने, सतत वाद होत असल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. म्हणूनच जास्त वेळ वाट न पाहता दाम्पत्य आपापली वेगळी वाट निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लोकांची घटस्फोटाची कारणं अजब असतात. काही वेळा घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान विचित्र प्रकार घडतो. सध्या अशीच एक अजब घटना समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात घटस्फोटाचासाठी अर्ज करताना एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचे खासगी फोटो न्यायालयाला पाठवून दिले आहेत. न्यायालयानेही या प्रकराची गंभीर दखल घेतली. परंतु संबंधित व्यक्तीने माफी मागितल्यानंतर न्यायालयाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी (2 जुलै) ही घटना घडली. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्यापुढे घटस्फोटाचे एक प्रकरण समोर आले होते. यावेळी एका व्यक्तीने मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, अशी मागणी करणारा एक अर्ज न्यायालयाला दिला. या अर्जासोबत त्याने आपल्या पत्नीचे खासगी फोटोही न्यायालयाकडे पाठवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने अशा प्रकारचे कृत्य हे गंभीर चुकीच्या श्रेणीत येतात, असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या वकिलाने तसेच त्या व्यक्तीने न्यायालयाची माफी मागितली. आमच्याकडन चूक झाली असे मान्य केल्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली. परंतु तुम्ही असे संवेदनशील कागदपत्रं न्यायालयाला देत असाल तर ते बंद लिफाफ्यात देणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

विष्यात अशा प्रकारची चूक होता कामा नये

वैवाहिक जीवनात अशा प्रकारच्या चुका होतात. अशा चुका सुधारल्या पाहिजेत, असेही मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. दरम्यान, न्यायालयाने संबंधित व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या वकिलावर कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु त्या व्यक्तीला मात्र इशारा देण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक होता कामा नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच महिलेना आपली ओळख लपवण्याचा पूर्ण अधिकार असून त्याबाबत फॅमिली कोर्टात जाण्याची मुभा दिली आहे.

Follow Us