
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्यामध्ये अनेक प्रकार असले तरी हापूस आंबा चवीला अंत्यत गोड आणि सुमधूर लागतो. दूरुनही तो त्याच्या सुंगधाने आपली दखल घ्यायला लावतो. वास्तविक पाहाता, उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात आंब्याच्या पेट्या बाजारात येऊ लागतात. परंतू त्याआधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातही आंब्याच्या पेट्या बाजारात पहिली पेटी म्हणून दाखल होतात. हापूस किंवा अल्फान्सोला सर्वात जास्त मागणी असते. सुरुवातीला बहुतेकांच्या आवाक्या बाहेर असलेल्या या आंब्यांना सोन्यासारखा भाव असतो. यंदा जानेवारी महिन्यात पुण्याच्या बाजारात दाखल झालेल्या आंब्याने चक्क 440 रुपये प्रति नग भाव गाठला होता. खरेतर अल्फान्सो या शब्दाचे अपभ्रंश म्हणून हापूस हा शब्द निर्माण झाला आहे. अल्फान्सो आंबा म्हणजेच आपल्या मराठीत हापूस आंबा होय. या हापूसच्या आंब्याची कहाणी मोठी मनोरंजक आहे. अल्फान्सो डी अल्बुकर्क हा पोर्तूगिजांचा सेनानी होता. अल्फान्सो डी अल्बुकर्क यांचा जन्म 1453 मध्ये पोर्तुगालमधील लिस्बनजवळील अलहंद्रा येथे झाला. तो सहा...