भारतात वर्षभरात फ्लाइंग कार, घरच्या गच्चीवरुन टेक-ऑफ अन् लँडींग

| Updated on: Feb 14, 2024 | 9:19 AM

flying car first model | सध्या अनेक मोठ्या शहरात वाहतूक ठप्प होत असते. पुणे आणि मुंबई शहरात हा नेहमीचा प्रकार झालला आहे. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यामुळे सर्वसामन्य चांगले वैतागलेले आहेत.

भारतात वर्षभरात फ्लाइंग कार, घरच्या गच्चीवरुन टेक-ऑफ अन् लँडींग
Follow us on

नवी दिल्ली, दि. 14 फेब्रुवारी 2024 | देशातील कार उद्योगात क्रांती होणार आहे. आता रस्ताने चालणाऱ्या कारसोबत हवेत उडणाऱ्या कार लवकरच येणार आहेत. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुजुकी या कारची निर्मिती करणार आहे. ही कार घरच्या गच्चीवरुन उडवता येणार आहे. तसेच कारचे लँडींग घरच्या छतावर करता येणार आहे. सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे ग्लोबल ऑटोमोबाइलच्या प्लानिंग डिपार्टमेंटचे असिस्टेंट मॅनेजर केंटो ओगुरा यांनी यासंदर्भात माहिती दिली. जपान, अमेरिकेनंतर भारत फ्लाईंग कार बनवणारा तिसरा देश ठरणार आहे.

कशी असणार कार

फ्लाइंग कार इलेक्ट्रीकवर असणार आहे. तिला इलेक्ट्रिक एअर कॉप्टरही म्हटले जाईल. ही कार पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा लहान असणार आहे. त्यात पायलटसह तीन जण बसू शकतात. शहरात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस म्हणून या कारचा वापर करता येणार आहे. येत्या वर्षभरात म्हणजे २०२५ पर्यंत ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. हवेतून उडणाऱ्या या टॅक्सीमुळे भविष्यात हवेतून उडण्याचा आनंद घेता येईल.

भारतात उत्पादन, किंमत कमी

कारचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. यासाठी एव्हिएशन रेग्यूलेटर ( DGCA) अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. मेक इंन इंडिया अंतर्गत निर्माण होणाऱ्या या कारची किंमत कमी असणार आहे. ‘मोटर आणि रोटर्स 12 युनिटसह हिला जपानमध्ये 2025 ओसाका एक्सपोमध्ये लॉन्च केले जाईल. सर्वात आधी फ्लाइंग कार जपान आणि अमेरिकीत येणार आहे. त्यानंतर ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात उत्पादन आणि विक्री होणार आहे.

हे सुद्धा वाचा

हा ही होणार फायदा

सध्या अनेक मोठ्या शहरात वाहतूक ठप्प होत असते. पुणे शहरात हा नेहमीचा प्रकार आहे. कोणत्याही चौकात, सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यामुळे सर्वसामन्य चांगले वैतागलेले आहेत. त्यातच रस्त्याचे रुंदीकरण, उड्डाणपूलाचे काम, नवीन रस्त्याचे काम यामुळे तर या समस्येत आणखी भर पडते. या झंझटीतून बाहेर पडण्यासाठी इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी चांगला पर्याय ठरणार आहे.