ना पेट्रोलची चिंता ना ट्रॅफीकची कटकट, आली उडणारी इलेक्ट्रीक कार

हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या वाहनाला अमेरिकेने प्रमाणपत्र दिले आहे. ही एक फंक्शनल इलेक्ट्रीक कार असून जिला तुम्ही रस्त्यावर चालवू शकता किंवा थेट आकाशात देखील उडवू शकता.

ना पेट्रोलची चिंता ना ट्रॅफीकची कटकट, आली उडणारी इलेक्ट्रीक कार
flying-electric-carImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 8:45 PM

नवी दिल्ली : ना पेट्रोलची चिंता करायची गरज, ना ट्रॅफीक जामची कटकट आता उडणारी इलेक्ट्रीक कार येणार आहे. एखाद्या सायन्स फिक्शन मुव्हीत असणाऱ्या कार प्रमाणे उडती कार ( Flying Cars ) आता प्रत्यक्षात येणार आहे. ही कार इलेक्ट्रीक ( Electric Cars ) असून ती रस्त्यावर तसेच आकाशातही हेलिकॉप्टरप्रमाणे ( Helicopter ) व्हीर्टीकल टेकऑफ घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे या कारसाठी रनवेची काहीही गरज लागणार नाही. या फ्लाईंग कारला प्रमाणपत्र आणि मंजूरी देखील मिळाली आहे.

अमेरिकेतील एलेफ एअरोनॉटीक्स कंपनीने ही कार फ्लाईंग इलेक्ट्रीक कार विकसित केली आहे. कंपनीने घोषणा केलेल्या या ब्रॅंडच्या कारच्या ‘मॉडेल ए’ ला अमेरिकेच्या एव्हीएशन एडमिनिस्ट्रेशनने ( FAA ) विशेष उड्डाण योग्यता प्रमाणपत्र दिले आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या वाहनाला अमेरिकेने प्रमाणपत्र दिले आहे. ही एक फंक्शनल इलेक्ट्रीक कार असून जिला तुम्ही रस्त्यावर चालवू शकता किंवा थेट आकाशात देखील उडवू शकता. कंपनीने म्हटले आहे की FAA इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेकऑफ आणि लॅंडींग ( eVTOL ) वाहनासोबत ग्राऊंड इंफ्रास्ट्रक्चरला नियंत्रित करण्यासाठी आपली धोरणावर सक्रीय रुपात काम करीत आहे.

कशी आहे उडणारी कार 

एलेफ एअरोनॉटिक्सने साल 2016 मध्ये या कारचा पहिला प्रोटोटाईप तयार केला होता. हे एक असे वाहन आहे ज्याला कार सारखे ड्राईव्ह करता येते, तसेच हेलिकॉप्टर प्रमाणे व्हर्टीकल टेकऑफ आणि लॅंडींग देखील करता येते. कंपनीच्या दाव्यानूसार ‘मॉडेल A’ ची ड्रायव्हींग रेंज 200 मैल अर्थात 321 किलोमीटर इतकी आहे. ही कार हवेत 110 मैल किंवा 177 किलोमीटरचा प्रवास करु शकते.

2025 पासून कारचे उत्पादन

या इलेक्ट्रीक फ्लाईंग कारची किंमत 300,000 डॉलर इतकी ( भारतीय मुल्य- 2 कोटी 46 लाख रुपये ) आहे. या कारची विक्री ऑक्टोबर 2022 मध्ये सुरु झाली होती. आतापर्यंत तिच्या 440 अधिक मॉडेल्सची बुकींग झाली आहे. एलेफ एअरोनॉटिक्स 2019 पासून आपल्या प्रोटोटाईपची चाचणी करीत आहे. या कारचे उत्पादन साल 2025 च्या चौथ्या तिमाही पासून सुरु होणार आहे.

आणखी एका मॉडेलवर काम

एलेफ एअरोनॉटिक्स ही कंपनी आणखी एक इलेक्ट्रीक फ्लाईंग सेडान कारवर काम करीत आहे. यात चार व्यक्ती बसू शकतात. या मॉडेलला ‘मॉडेल झेड’ असे नाव दिले आहे. या मॉडेल झेडची उड्डाण रेंज 300 मैलाहून अधिक आहे. आणि ड्रायव्हींगची रेंज 200 मैलाहून अधिक असण्याची शक्यता आहे. साल 2035 पर्यंत हे मॉडेल बाजारात येण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.