AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच 66 रुपये लिटर इंधनात धावणार गाड्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

पेट्रोल-डीझल गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाचे वाढते दर पाहून जगभरातील सरकारे इथेनॉल ब्लेंडेड फ्युअलवर काम करीत आहेत.

लवकरच 66 रुपये लिटर इंधनात धावणार गाड्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
नितीन गडकरी प्रकरणात लष्कर ए तोएबाच्या पाशाचा हातImage Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2023 | 4:42 PM
Share

दिल्ली : नेहमीच नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी आणखी एक जोरदार घोषणा केली आहे. देशात 100 टक्के इथेनॉल ( Ethanol Fuel ) इंधनावर धावणारी वाहने येत्या ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्यात येतील अशी घोषणा गडकरी यांनी एका मुलाखतीत केली आहे. हा निर्णय देशासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. यामुळे आयात शुल्क, इंधनावरील खर्च आणि प्रदुषण ( Pollution )  कमी होणार आहे. तसेच संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून इथेनॉल इंधनावरील वाहनांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या भारतीय बाजारात इथेनॉलची किंमत 66 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे. आणि पेट्रोलची किंमत 108 रुपयांच्या आसपास आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतीय रस्त्यावर स्वस्तातील इथेनॉलवरील दुचाकी आणि चारचाकी वाहने धावताना दिसणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात 100 टक्के इथेनॉल इंधनावरील वाहने लॉंच करण्यात येतील, बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी मोटारसायकली तयार केल्या आहेत. टोयोटा कंपनीच्या 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के वीजेवर चालणाऱ्या कॅमरी कारच्या धर्तीवरील वाहने देशात लॉंच केली जातील. जी 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीजेवर चालतील.

इथेनॉल म्हणजे काय ?

इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहल आहे. जे स्टार्च आणि साखरचे फर्मेंटेशन तयार होते. ऊसापासून साखर तयार करताना साखर कारखान्यात इथेनॉल तयार करता येते. त्यात पेट्रोल मिक्स करुन ते इको फ्रेंडली इंधनासारखे वापरले जाऊ शकते. इथेनॉल ऊसाच्या रसापासून होते. तसेच स्टार्च कॉन्टेनिंग मटेरियल्स सारखे मक्का, कुजवलेले बटाटे, भाजीपाला यापासून देखील इथेनॉल तयार करता येते.

1 G इथेनॉल : फर्स्ट जनरेशन इथेनॉल ऊसाच्या रसापासून, गोड बिट, सडलेले बटाटे, गोड ज्वारी आणि मक्क्यापासून तयार होतील.

2 G इथेनॉल : सेकंड जनरेशन इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्नोसेल्यूलोसिक मटेरियल उदा. तांदळाचा भूसा, गव्हाचा भूसा, कॉर्नकॉब ( भूट्टा ), बांबू आणि वुडी बायोमास पासून तयार केले जाते.

3 G इथेनॉल : थर्ड जनरेशन बायोफ्यूअल शेवाळापासून तयार केले जाते. यावर अद्याप संशोधन सुरु आहे.

एप्रिलपासून देशात E – 20 ची विक्री 

पेट्रोल-डीझल गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाचे वाढते दर पाहून जगभरातील सरकारे इथेनॉल ब्लेंडेड फ्युअलवर काम करीत आहेत. भारतात देखील इथेनॉलला पेट्रोलला पर्याय म्हणून पाहीले जात आहे. इथेनॉलमुळे गाड्यांचे मायलेज वाढणार आहे. देशात 5 टक्क्यांच्या इथेनॉलपासून प्रयोगाला सुरुवात झाली होती. ती आता 20 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

नॅशनल बायो फ्युअल पॉलिसी

सरकारने एप्रिल महिन्यापासून नॅशनल बायो फ्युअल पॉलिसी लागू करीत E – 20 ( 20 टक्के इथेनॉल+ 80 टक्के पेट्रोल ) पासून ते E -80 ( 80 टक्के इथेनॉल + 20 टक्के पेट्रोल ) पर्यंत पोहचण्यात लक्ष्य गाठण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. देशात एप्रिलपासून केवळ फ्लेक्स फ्युएल कंप्लाईंट गाड्यांची विक्री सुरु केली आहे. जुन्या गाड्यांना इथेनॉल इंधन कम्पाएंट व्हीईकलमध्ये परिवर्तीत करण्याची योजना आहे. परंतू याकरीता अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.