AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारचा लुक..मायलेज..नव्हे तर या गोष्टीला प्राधान्य देतात ग्राहक, सर्वेक्षणात आश्चर्यकारक बाब उघड

पूर्वी कार किंवा अगदी बाईक घेतानाही कितना देती है ? म्हणजे मायलेज किती देते असे विचायचे. आता मात्र कार विकत घेताना त्यात सेफ्टी किती आहे ते पाहिले जात आहे.

कारचा लुक..मायलेज..नव्हे तर या गोष्टीला प्राधान्य देतात ग्राहक, सर्वेक्षणात आश्चर्यकारक बाब उघड
CAR SAFETY
| Updated on: Jun 29, 2023 | 6:14 PM
Share

दिल्ली : पूर्वी कार विकत घेताना मायलेज किती देते हा प्रश्न ग्राहक ( Consumer ) विचारायचे. आता कार खरेदी करण्यामागचे लोकांचे प्राधान्यक्रम बदलेले आहेत. आता लोक कारचा लूक, डीझाईन आणि मायलेज ( Mileage ) शिवाय वाहनामध्ये काय सेफ्टी फिचर्स ( Safety Features ) दिले आहेत त्यावर जास्त लक्ष देत आहेत. अलिकडे केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. अलिकडेच केलेल्या पाहणीत 10 पैकी 9 लोकांनी कारच्या सुरक्षा रेटींगला महत्वाचे स्थान दिले आहे. म्हणजे चांगल्या सेफ्टी फिचर्स असलेल्या गाड्यांनाच आता मागणी आहे.

अलिकडे स्कोडा ऑटो इंडीया संघटनेने NIQ BASES द्वारा पाहणी केली. त्यानूसार भारतीय कार खरेदी करताना दोन गोष्टीची काळजी घेतात. एक आहे कारची क्रॅश टेस्टींग रेटींग आणि दुसरी बाब म्हणजे वाहनात एअरबॅगची संख्या किती आहे. तर कारचे मायलेज स्थान आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.

काय म्हणतो हा सर्वे 

या सर्वेक्षणात जवळपास 67 टक्के लोकांचा समावेश होता, ज्यांच्याकडे सुमारे पाच लाख रुपयांची कार आहे. तर 33 टक्के असे लोक होते, ज्यांचे कडे कार नाही परंतू ती खरेदी करण्याची इच्छा आहे. या सर्वेत 18 पासून 54 वयोगटातील लोकांचा समावेश होता. यात 80 टक्के उत्तरदेणारे पुरुष तर 20 टक्के महिला होत्या. सर्वात अधिक 22.2 टक्के लोकांनी कारच्या क्रॅश रेटींगला जास्त महत्व दिले. तर 21.6 टक्के लोकांनी कारमध्ये एअरबॅगना महत्व दिले. तर 15 टक्के लोकांनी मायलेजला महत्व दिले.

पूर्वी मायलेजला महत्व

पूर्वी लोक कारच्या मायलेजला जास्त महत्व द्यायचे. आता पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती गगनाला भिडल्या तरी लोक सेफ्टीला महत्व देत आहेत. कारच्या क्रॅश रेटींग बाबत दिलेले प्राधान्य पाहिले तर 5 स्टार रेटींगला कमाल 22.2 टक्के लोकांनी रस दाखविला, तर 4 स्टार रेटींगला 21.3 टक्के लोकांना रुची दाखविली, तर झीरो स्टार रेटींगला केवळ 6.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

सुरक्षा आणि सेफ्टी रेटींग्सला महत्व

या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे की वाहनांची सुरक्षा आणि सेफ्टी रेटींग्सला लोक जास्त महत्व देत आहेत. क्रॅश रेटींगला ग्राहकांनी आपला प्राधान्यक्रम दिला आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 10 राज्यातील 1,000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील ग्राहकांचा समावेश करण्यात आला असल्याचे प्रादेशिक संचालक अमृता श्रीवास्तव यांनी सांगितले.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.