Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘मेलोडी’ची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती?

Melody Chocolate: इटली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध 'मेलोडी' चॉकलेट भेट म्हणून दिलं. पार्ले कंपनीच्या मेलोडी टॉफीची कहाणी आणि तिच्या यशाबद्दल सविस्तर जाणून घ्या..

Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या मेलोडीची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 11:27 AM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रोममधील भेट देशभरात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ही भेट केवळ राजनैतिक चर्चेपुरती मर्यादित नव्हती. तर या भेटीत एक असा गोड क्षणही होता, ज्याने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध चॉकलेट ‘मेलोडी’ भेट देतानाचा हा तो क्षण होता. या क्षणाचा व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताच वाऱ्याच्या वेगाने तो व्हायरल झाला. मोदी आणि मेलोनी यांच्या या व्हिडीओवर आणि ‘मेलोडी’च्या गोड भेटीवर सोशल मीडियावर आणि राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूँ है’ ही टॅगलाईन तुम्ही ऐकलीच असेल. नव्वदच्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला हे फक्त चॉकलेटच नव्हतं तर भारतीय पॉप कल्चरचा एक भाग बनलं होतं. देशात फार क्वचितच तुम्हाला एखादी व्यक्ती सापडेल, ज्याने आजवर या चॉकलेटची चव चाखली नसेल. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us