Ashwini Vaishnaw: मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून Zoho वापरण्यास सुरुवात, या स्वदेशी प्लॅटफॉर्ममध्ये आहे तरी काय?

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी Zoho हा प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Ashwini Vaishnaw: मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून Zoho वापरण्यास सुरुवात, या स्वदेशी प्लॅटफॉर्ममध्ये आहे तरी काय?
Ashwini Vaishnav Zoho
| Updated on: Sep 22, 2025 | 9:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील जीएसटी बदलांबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीवरही भर दिला. शक्य तितक्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि परदेशी वस्तू टाळा असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी दिली. त्यानंतर आज केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी Zoho हा प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी झोहो प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली आहे. वैष्णव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘मी झोहो प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होत आहे. हे कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि प्रझेटेशनसाठी आपले स्वतःचे स्वदेशी व्यासपीठ आहे. मी सर्वांना स्वदेशी उत्पादने आणि सेवा स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो.’ Zoho हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे तुम्ही सर्व महत्त्वाची कामे करु शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात स्वदेशीवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्वदेशीवर भर दिला होता. पंतप्रधान म्हणाले होते की, आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. यासाठी एमएसएमई आणि लघु उद्योगांवर मोठी जबाबदारी आहे. देशाला आवश्यक असलेले कोणतेही उत्पादन, जर ते देशातच तयार झाले तर त्याला विकासाला फायदा होईल.

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की, एमएसएमई, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि कुटीर उद्योगांकडून खूप अपेक्षा आहेत. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा दर्जा श्रेष्ठ असायला हवा. आपण जे उत्पादन तयार करतो ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. त्या उत्पादनांनी भारताची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे. आज अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपण यापासून मुक्त झाले पाहिजे. आपण अशा वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या भारतात बनल्या आहेत. पंतप्रधानांनी प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवण्याचे आवाहन केले. अभिमानाने म्हणा की हे स्वदेशी आहे. अभिमानाने सांगा की मी स्वदेशी खरेदी करतो असे आवाहनही पंतप्रधानांनी केले होते. त्यानंतर आता मंत्री वैष्णव यांनी स्वदेशीचा स्वीकार केला आहे.