टीव्ही 9 नेटवर्कच्या Duologue NXT कार्यक्रमात बरुण दास यांची रिया सिंघा यांच्याशी चर्चा!
ड्युओलॉग NXT या टीव्ही 9 नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमाची देशभरात चर्चा असते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींंना आमंत्रित केले जाते. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी एका खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

Duologue NXT : सध्या टीव्ही 9 नेटवर्कच्या ड्यूओलॉग NXT या विशेष कार्यक्रमाची देशभरात चर्चा आहे. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरुण दास देशातील प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद साधतात. ड्युओलॉग NXT च्या मंचावर झालेल्या साधक-बाधक चर्चेतून आलेल्या पाहुण्याच्या आयुष्याचे अनेक पैलू समोर येतात. दरम्यान आता याच कार्यक्रमात मीस यूनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब मिळवलेल्या रिया सिंघा यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमादरम्यान बरुण दास यांनी रिया यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं आहे.
रिया सिंघा यांनी मांडले वेगवेगळ्या विषयांवर मत
रेडिको प्रस्तुत ड्युओलॉग NXT या कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हाला रिया सिंघा पाहायला मिळतील. रिया सिंघा यांना मिस युनव्हर्स इंडिया हा खिताब मिळालेला आहे. या यशानंतर सध्या त्या बॉलिवुडकडे वळाल्या आहेत. या कार्यक्रमात बरुण दास यांनी रिया यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. सोबतच बरुण दास यांनीदेखील त्यांचे अनुभव, विचार सांगितले आहेत. इमानदारी आणि विचारांतील स्पष्टता यावर रिया सिंघा यांनी फार महत्त्वाचे मत मांडले आहे. मिस युनिव्हर्स इंडिया हा खिताब मिळाल्यामुळे माझा पुढचा प्रवास सोपा झाला, हे खरे आहे. पण कोणत्याही बाबतीत यश हवं असेल तर त्यासाठीची तयारी यावरच तुमचं यश अवलंबून असतं, हे मला यातून समजून आल्याचं मत यावेळी रिया यांनी व्यक्त केलं. तसेच कोणत्याही यशासाठी तयारी हा पर्याय असू शकत नाही. तयारी करणे ही अनिवार्यता असायला हवी, असेही यावेळी रिया यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाविषयी रिया सिंघा नेमकं काय म्हणाल्या?
या गप्पांमध्ये बरुण दास यांनी व्यक्तीची स्वप्नं आणि या स्वप्न साकार करण्यासाठीची शिस्त यावर आपले मत मांडले आहे. रिया यांनी ड्युओलॉग NXT या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमात येण्याचा मान मिळणे ही एक अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक बड्या व्यक्ती आलेल्या आहेत. या लोकांमध्ये माझा समावेश होणे ही अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमात होत असलेल्या चर्चेमधून स्वत:ला बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं मत रिया यांनी व्यक्त केलं.
कार्यक्रम कुठे पाहता येईल?
दरम्यान, ड्युओलॉग NXT कार्यक्रमातील हा प्रेरणादायी भाग तुम्हाला 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडे दहा वाजता न्यूज 9 वर पहता येणार आहे. सोबतच तुम्हाला हा भाग @Duologuewithbarundas या यूट्यूब चॅनेलवरही पाहता येईल. न्यूज 9 प्लस अॅपवरदेखील तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता.