टीव्ही 9 नेटवर्कच्या Duologue NXT कार्यक्रमात पाहुणी म्हणून रिद्धी डोगरा, TV9 नेटवर्कचे MD बरुण दास यांच्याशी केल्या मनमोकळ्या गप्पा!
टीव्ही 9 नेटवर्कच्या Duologue NXT या प्रसिद्ध कार्यक्रमात तुम्हाला रिद्धी डोगरा पाहुणी म्हणून पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात तिने तिची जडणघडण, अभिनेत्री म्हणून झालेला उदय तसेच इतरही अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

Ridhi Dogra In Duologue NXT : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असलेल्या टीव्ही 9 नेटवर्कच्या Duologue NXT या विशेष कार्यक्रमाची देशभरात चर्चा असते. या कार्यक्रमात नेमका कोणता पाहुणा येणार आणि हा पाहुणा कोणकोणत्या विषयांवर भाष्य करणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागते. दरम्यान, आता या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगरा पाहुणी म्हणून येणार आहे. Duologue NXT कार्यक्रमातील आजच्या भागात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास रिद्धी डोगराला बोलतं करताना दिसणार आहेत. दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे चर्चा झाली आहे.
कार्यक्रम कुठे कुठे पाहता येईल?
Duologue NXT कार्यक्रमाचा हा भाग तुम्हाला बुधवारी रात्री साडे दहा वाजता News9 वर पाहायला मिळेल. सोबतच हा कार्यक्रम ड्यूओलॉग या यूट्यूब चॅनेलवरही पाहता येईल (@Duologuewithbarundas) यासह हा कार्यक्रम तुम्ही News9 Plus या अॅपवरही पाहू शकता. या भागात रिद्धी डोगरा तुम्हाला आत्मशोध, कलात्मक साहस यावर बोलताना पाहायला मिळेल. सोबतच रिद्धीने आपले अंतर्मन आणि अंतर्मनासोबतचा प्रामाणिकपणा यावरही चांगले भाष्य केले आहे.
Duologue NXT कार्यक्रमाबद्दल रिद्धी भरभरून बोलली
रिद्धी डोगरा आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा प्रवास खडतर राहिलेला आहे. सुरुवातीला तिने कॉर्पोरेट टेलिव्हिजनमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर तिने करिअरच्या सुरुवातीला काही जाहिरातींमध्येही काम केलं. तिच्या याच प्रवासाची आठवण काढत तिने या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. मी एक अभिनेत्री व्हावं असं माझ्या नशिबाला वाटत असावं. मला फक्त माझ्या स्वत:चीच बॉस व्हायचं होतं. अभिनय माझ्यासाठी एक प्लॅन नव्हे तर मी अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम होतं, असंही तिने या कार्यक्रमात सांगितलेलं आहे. रिद्धीने Duologue या कार्यक्रमावरही भाष्य केल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. ही एक चांगली चर्चा होती. मी अशा अनेक विषयांवर चर्चा करेन असं मला वाटलं नव्हतं, असं मत रिद्धीने व्यक्त केलं आहे.
