‘या’ राज्यात मुस्लिम असुरक्षित? 200 चा मॉब चालून आला नी केली…

| Updated on: Oct 13, 2022 | 10:26 PM

नमाज पडतानाही काही लोकांना बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जणांना जीवे मारण्याची धमकी देऊन ​​मशिदीला बाहेरून कुलूपही लावले होते.

या राज्यात मुस्लिम असुरक्षित? 200 चा मॉब चालून आला नी केली...
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या विविध भागात जातीय ताणतणावाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समाजातील परस्पर सलोखा सतत बिघडत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दिल्ली जवळ असलेल्या हरियाणातील (Hariyana) गुरुग्राममध्ये (Gurugram) नुकताच दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. गुरुग्राममधील भोडकलान येथील काही जणांनी बुधवारी संध्याकाळी मशिदीला घेराव घातल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्याच गुंडांनी मशिदीवर हल्लाही (Attack on the mosque)  केल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच नमाज पडतानाही काही लोकांना बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जणांना जीवे मारण्याची धमकी देऊन ​​मशिदीला बाहेरून कुलूपही लावण्यात आले होते.

गुरुग्राम पोलिसांनी मशिदीची तोडफोड आणि तेथील नागरिकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अनेकांजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्या व्यक्तीनी फिर्याद दाखल केल आहे त्यांनी सांगितले की, आज सकाळी सुमारे 200 जणांचा मॉब आमच्यावर चालून आला.

आणि आम्हाला गावातून हाकलून लावण्याची धमकी दिली. यावेळी या मॉबकडून गावतील अनेकांना गाव सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर त्या गुंडांचे ऐकून घेतले नसल्यामुळे त्यांनी त्यानंतर हत्यारांच्या जोरावर आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला.

बिलासपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुभेदार नजर अहमद यांनी काल संध्याकाळी काही लोक मशिदीमध्ये नमाज अदा करत होते. त्यावेळी काही समाजकंठकांनी आत घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली.

समाज कंठकांच्या मारहाणीत अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. याच समाजकंठकांनी नंतर लोकांना आत कोंडून बाहेरून कुलूप लावून निघून गेले होते.

गावात मुस्लिम समाजाची चारच घरे असल्याचे सांगण्यात येत असून हत्तारे आणि समाजकंठकांच्या बळावर येथील मुस्लीम समाजातील लोकांना गावाबाहेर हाकलून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

आम्ही यापैकी काही हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात राजेश चौहान, अनिल भदौरिया आणि संजय व्यास या तीन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.